परभणी(Parbhani) :- ६८ व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात परभणीच्या श्वान टायसनने उत्कृष्ट कामगिरी करत पहिला क्रमांक पटकाविला आहे. टायसनची झारखंड (Jharkhand)येथे होणार्या ऑल इंडिया कॉम्पीटेशनसाठी महाराष्ट्र राज्य पोलीस(Maharashtra State Police) दलातर्फे निवड झाली आहे.
उत्कृष्ट कामगिरी करत पहिला क्रमांक
पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सपोनि. बालाजी तोटेवाड यांच्या मार्गदर्शनात श्वान टायसनने पुणे येथे कर्तव्य मेळाव्यात सहभाग घेतला. पोह. राम जाधव, सादेक पठाण या श्वान विशेष प्रशिक्षकांनी पुणे येथे हजर राहून सराव घेतला.