Parbhani: परभणीत पालिकेची थकबाकी असेल नावावर तर पथक धडकेल दारावर

2 hours ago 1

Parbhani:- नगरपरिषद मानवत च्या वतीने विशेष वसुली मोहीम राबविण्यात आली याचे नेतृत्व श्रीमती कोमल सावरे मुख्याधिकारी तथा प्रशासक नगर परिषद मानवत यांनी केले आहे. मुख्याधिकारी या स्वतः जातीने वसुलीसाठी स्वतः रस्त्यावर उतरल्या. वसुलीच्या बाबतीत मुख्याधिकारी यांनी कडक पवित्रा घेतला असून शहरातील सर्व नागरिकांनी आपल्याकडे असलेली थकबाकी घरपट्टी, नळपट्टी, जमीन भाडे गाळा किराया भरून नगर परिषदेत (City Council) सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.

मानवत नगर परिषद ची विशेष वसुली मोहीम

नगरपरिषदेच्या हद्दीतील प्रभाग निहाय डोअर टू डोअर वसुली मोहीम राबविण्यात येणार आहे असे मुख्याधिकारी श्रीमती कोमल सावरे यांनी सांगितले. दुकान भाडे न न भरणाऱ्या वरती कडक कार्यवाही करण्यात येणार आहे. उद्या पासून अशीच वसुलीमुळे राबवली जाणार आहे असे नमूद केले. तरी शहरातील सर्व नागरिकांनी आपल्याकडे असलेली घरपट्टी, नळपट्टी, दुकान भाडे, त्वरित भरणा करून नगर परिषदेत सहकार्य करावे अशी आवाहन नगर परिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती कोमल सावरे यांनी केले आहे. जेणेकरून शहरातील सर्व नागरिकांना नगरपरिषदेमार्फत राबवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या योजना तसेच सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यास मदत होईल. नगरपरिषदेचा कारभार चालविण्यास अडचण निर्माण होणार नाही. कारण सर्व कारभार हा वसूल होणाऱ्या कर प्रणाली द्वारे चालत असतो.

या उपक्रमामध्ये अन्वर सय्यद, संतोष उन्हाळे,भगवान शिंदे, रामराव चव्हाण,श्रीमती वंदना इंगोले,मंगेश खोडवे, शताणिक जोशी, भारत पवार,संतोष खरात,राजेश शर्मा, हनुमंत बिडवे, शेख वसीम,भगवान बारटक्के, काळे,रवी दहे,मनमोहन बारहाते, संजय रुद्रवार, दीपक सातभाई, शिवाजी कच्छवे, रावसाहेब झोडपे, पंकज पवार, शेख वसीम,सचिन सोनवणे,रवी दहे, बाळाभाऊ लाड, मुंजा डोळसे, सोनाजी काळे, नारायण काळे, संजय कुऱ्हाडे, नारायण व्यवहारे यांच्यासह नगरपरिषदेचे सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या विशेष मोहीमेमध्ये भाग घेतला.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article