OBC Bahujan Aghadi: ओबीसी बहुजन आघाडी आक्रमक

1 hour ago 1

विभागीय समाज कल्याण कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन

अमरावती (OBC Bahujan Aghadi) : ओबीसी विद्यार्थ्यांसाठीचे स्वतंत्र वसतीगृह अद्यावत सोयी सुविधा करून सुरू करण्यात यावे या मागणीसाठी तसेच अंतरवाली सराटी जि. जालना येथे ओबीसी, भटक्या विमुक्त जाती जमातीच्या वतीने आरक्षण बचाव आमरण उपोषण सुरू आहे. त्याला पाठिंबा म्हणून सुद्धा (OBC Bahujan Aghadi) ओबीसी बहुजन आघाडी अमरावती जिल्ह्याच्या वतीने विभागीय समाज कल्याण भवन समोर आज एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र असे ७२ वसतीगृह राज्य शासनाने मंजूर केले आहे. त्यानुसार अमरावती जिल्ह्यात अद्यावत सोयी सुविधा करून ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठीचे वसतीगृह सुरू करण्यात यावे या मागणीसाठी तथा अंतरवाली सराटी येथे (OBC Bahujan Aghadi) ओबीसी बहुजन भटक्या विमुक्त जाती जमातीच्या वतीने आरक्षण बचाव आमरण उपोषण सुरू आहे. यात बाळासाहेब बटुळे (मामा) ,ऍड. मंगेश ससाने ,संतोष वीरकर, शरद राठोड, प्रा. विठ्ठल तळेकर ,बाळासाहेब दखणे या ६ योद्धांचे आमरण उपोषण सुरू आहे . याची दखल राज्य शासन व प्रशासनाने घेतली नाही. परिणामी ओबीसीच्या भावना तीव्र झाल्या.

परिणामी याला पाठिंबा म्हणून ओबीसी बहुजन आघाडीचे (OBC Bahujan Aghadi) जिल्हाध्यक्ष प्रवीण पेटकर यांच्या नेतृत्वात तसेच आघाडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा विदर्भ प्रभारी डॉ. ज्ञानेश्वर गोरे, विदर्भ अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती माजी सभापती अशोक दहीकर, ओबीसी जनमोर्चा प्रदेश उपाध्यक्ष व्ही ,डी. काळे यांच्या उपस्थितीत विभागीय समाज कल्याण भवन समोर एक दिवसीय धरणे आंदोलन सकाळी १० ते दुपारी ३ पर्यंत आयोजित करण्यात आले . यावेळी धरणे आंदोलन स्थळी विभागीय समाज कल्याण कार्यालयातील अधिकारी यांनी भेट देऊन ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात वसतीगृह सुरू करण्याचे लेखी पत्र दिले. धरणे आंदोलनात.

महिला जिल्हाध्यक्ष डॉ. नीलिमा मुळे, सुभाष सातव ,संजय व- हे कर ,अमरावती शहर अध्यक्ष अजय राऊत ,अमरावती जिल्हा उपाध्यक्ष नंदू भाऊ सहारे ,अमरावती जिल्हा उपाध्यक्ष निरंजन कुरवाडे, अमरावती जिल्हा संघटक तुषार वा ढनकर, अमरावती जिल्हा चिटणीस ललित ढेपे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संजय वाघुळे, अंजनगाव सुर्जी शहराध्यक्ष चंद्रशेखर देशमुख, शहर उपाध्यक्ष सुरज पवार, शशिकांत नवले, चेतन खंडारे, अक्षय हाडोळे, राजेंद्र ठाकरे ,राजेंद्र सरोदे, अमोल हाडोळे, माधुरी भूयार ,सुनीता गुल्हाने, योगिता गणोरकर, दिपाली गणोरकर तसेच अरविंद अकोलकर ,संदेश अहेर, संदीप राऊत, एड. प्रभाकर वानखडे ,नारायण सांडे, अंबादास मोहरकर, डॉ.चंद्रशेखर कुरळकर, संजय गणोरकर अशोक वाट प्रफुल फुलारी सुधीर गुल्हाने सुनीता गुल्हाने दत्तात्रय जाधव दिनकर सुंदरकर विष्णुपंत सुंदरकर शैलेश बागडे अवधूत पाचघरे मुकेश वानरी रामेश्वर चाटघोडे ओम गुल्हाने,आदी उपस्थित होते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article