परभणी (Parbhani) :- शहरातील अनाधिकृत फेरीवाल्यांवर कडक कारवाई करावी, या मागणीचे निवेदन शिवसेनेच्या (Shivsena)वतीने शुक्रवार ७ फेब्रुवारी रोजी मनपा प्रशासनाला देण्यात आले.
हातगाडे चालकांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी
परभणी शहर महापालिका (Parbhani City Municipality) हद्दित असलेल्या जिंतूर रोड, वसमत रोड, सुभाष रोड व परभणी शहरांतर्गत येणार्या रस्त्यांवर फेरीवाले, हातगाडीवाले हे न फिरता एकाच जागी उभे राहून आपला व्यवसाय करत आहेत. यामुळे वाहनांची रहदारी व नागरीकांना अडथळा निर्माण होत आहे. तसेच व्यापार्यांनी आपल्या प्रतिष्ठाणासमोर हातगाडे उभे केल्याने अडचणीत अधिक भर पडत आहे. शहरातील हातगाडे हे अनाधिकृत असून यांना महानगर पालिकेचा परवाना बंधनकारक असतो. मात्र त्यांची मनपाकडे कुठलीच नोंद नाही. या हातगाडे चालकांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. कारवाई न झाल्यास शिव जयंती उत्सवानंतर शिवसेना स्वत: कायदा हातात घेऊन कारवाई करेल, असे निवेदनात नमुद केले आहे.
या निवेदनावर शिवसेना नेते आनंद भरोसे, बाळासाहेब पानपट्टे, सचिन पाटील, बालाजी मोहिते, दिपक शिंदे, गिता सुर्यवंशी, कल्पना दळवी, बालिका सुरनर, पूजा मोरे, दासराव रणेर, सुनील खुळे, प्रविण गायकवाड, व्यंकटी जावळे, रामेश्वर जावळे, निरज बुचाले, संदीप शिंदे, दिपक शिंदे, महेश जाधव आदींच्या स्वाक्षर्या आहेत.