नागा चैतन्य सध्या त्याच्या 'थांडेल' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकत्याच्या एका पॉडकास्टमध्ये नागा चैतन्यने फिटनेसबाबत सांगताना असं काही वक्तव्य केलं की सर्वांनाच आश्चर्य वाटलं. नागा चैतन्य याने म्हटलं की "तिच्यापेक्षा दारू आणि तंबाखू बरी" असं वक्तव्य त्याने केलं आहे. सध्या त्याच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर सर्वत्र चर्चा होत आहे.
साउथ सुपरस्टार नागा चैतन्य 'थांडेल' चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याच्यासोबत या चित्रपटात सर्वांची लाडकी अभिनेत्री साई पल्लवी दिसणार आहे.
1 / 11
दरम्यान या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने नागा चैतन्य अनेक मुलाखतींना जात आहे.
2 / 11
एका पॉडकास्टमध्ये नागा चैतन्यने फिटनेसबद्दलचे आपले विचार मांडले. नागाने रॉ टॉक्स विथ व्हीके पॉडकास्टवर बोलताना त्याच्या फिटनेसबाबत सांगितलं.
3 / 11
नागा चैतन्य फिटनेस फ्रिक आहे. फिटनेसबद्दल बोलताना नागा असं काही बोलून गेला की सगळ्यांच्याच आश्चर्य वाटलं.नागाने त्याच्या फिटनेससंदर्भात बोलताना केलेल्या एका वक्तव्यामुळे सर्वजणच हैराण झाले.
4 / 11
सुरुवातीला फिटनेस फ्रिक नागा चैतन्य म्हणाला की, "साखर हे तुमच्या शरीरासाठी सर्वात मोठं विष आहे"
5 / 11
पुढे नागा चैतन्य म्हणाला की, "दारू चांगली, तंबाखू चांगली, काहीही चांगले. पण साखर नाही." नागा चैतन्याच्या या वक्तव्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या. नागा चैतन्याच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
6 / 11
तसेच नागा चैतन्य पुढे म्हणाला, "कृपया माझं बोलणं कोट करू नका, म्हणजेच यावर रील बनवू नका. माझा असा विश्वास आहे की साखरेमुळे आपल्याला कॅन्सर, मधुमेह आणि इतर अनेक समस्या उद्भवतात ज्या जीवघेण्या आहेत."
7 / 11
"मी याबाबत खूप जागरूक आहे. मी खूप कमी साखर खातो, ते ही फक्त माझ्या चीट डेच्या दिवसात", असंही नागा चैतन्यने सांगितलं.
8 / 11
सारखेपेक्षा दारू, तंबाखू चांगले हे नागाने जरी मस्करीत म्हटलं असलं तरी सोशल मीडियावर त्याच्या वक्तव्याची चांगलीच चर्चा रंगली आहे.
9 / 11
दरम्यान नागा चैतन्याने दुसरं लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच त्याच्या आणि समांथाच्या घटस्फोटाबद्दल मौन सोडलं.
10 / 11
समांथाबरोबर घटस्फोट घेताना हजार वेळा विचार केला असल्याचं नागा चैतन्यने म्हटलं.
11 / 11