परभणी (Parbhani) :- येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील (Health Centers) वैद्यकीय अधिकार्यांना ढकलून देऊन ओ.पी.डी. टेबलवरील काच फोडुन शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एका आरोपींविरुद्ध ताडकळस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
४ डॉक्टर हिंसाचार संरक्षण अधिनियम २०१० प्रमाणे गुन्हा दाखल
याबाबत ताडकळस पोलिस ठाण्यात वैद्यकीय अधिकारी डॉ.अभिजीत बापुराव शेळके यांनी फिर्याद दिली की, शुक्रवार ३१ जानेवारी रोजी रात्री ८:३० ते ९ वाजेच्या सुमारास महादु उर्फ बबलु बबन माने यांनी माझे दुखत आहे. माझ्यावर उपचार करा असे जोर जोरात ओरडुन डॉक्टरांच्या हातातील स्टेटस्कोप घेऊन टेबलावर आधळला. तसेच ओ.पी.डी. टेबलवरील काच फोडुन नुकसान केले. तसेच कर्तव्यावर असलेल्या डॉ.शेळके यांना ढकलून देऊन शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी ताडकळस पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध ४ डॉक्टर हिंसाचार(violence) संरक्षण अधिनियम २०१० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी सपोनि.गजानन मोरे यांनी भेट दिली. अधिक तपास बिट जमादार पोते हे करीत आहेत.