Parbhani: ३५ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन केली आत्महत्या

2 hours ago 2

परभणी/सेलू (Parbhani):- तालुक्यातील हिस्सी येथे एका ३५ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide)केल्याची घटना रविवार २२ सप्टेंबर रोजी सकाळी दहाच्या नंतर उघडकीस आली. याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती याप्रमाणे तालुक्यातील हिस्सी येथील अशोक बालासाहेब गात वय ३५ वर्ष याने राहच्या घरी नायलॉनच्या दोरीने पत्र्याला लावलेल्या अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

दोरीने पत्र्याला लावलेल्या अँगलला गळफास घेऊन आत्महत्या

मृतक अशोक गात याच्याकडे लोकांची असलेली उधारी आणि दारूचे व्यसन (alcohol)  यामुळे निर्माण झालेल्या आर्थिक विवंचनेतून आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलून स्वतःचे जीवन संपवले आहे. अशोक गात याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, भावजय, पत्नी आणि एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे. मृतकाचा भाऊ गजानन बालासाहेब गात याने दिलेल्या माहितीवरून आकस्मिक मृत्यूचे(sudden death) नोंद घेण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक दिपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शिवदास सूर्यवंशी पुढील तपास करत आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article