दोन ट्रक आदळले; एकाचा मृत्यू तर एक जखमी
पवनी (Pauni Accident) : कारधा-पवनी मार्गावरील बाम्हणी गावाजवळ दि.१८ जानेवारी रोजी रात्री १२ वाजता दरम्यान दोन ट्रक एकमेकांवर आदळले. त्यात एका ट्रकचालकाचा चेंदामेंदा होऊन जागीच मृत्यू झाला. तर क्लिनर जखमी झाला. यशवंत दामू बोपचे (२८) रा.पारडी नागपूर, असे मृतकाचे तर कुणाल उके (२०) रा.नागपूर, असे जखमीचे नाव आहे.
मृतक व जखमी हे दि.१८ जानेवारी रोजी रात्री १२ वाजतादरम्यान ट्रक क्र.एमएच ४० सीटी १४५० या ट्रकने पवनीकडून भंडाराकडे जात असतांना विरुद्ध दिशेने येणारा ट्रक क्र.एमएच ४० बीजी ३५३६ या ट्रकला विरुद्ध दिशेने जाऊन आदळला. त्यात ट्रक क्र.एमएच ४० सीटी १४५० या ट्रकची कॅबीन पूर्णत: चकनाचूर होऊन ट्रकचालक यशवंत बोपचे याचा चेंदामेंदा होऊन जागीच मृत्यू झाला. तर (Pauni Accident) ट्रकमधील क्लिनर कुणाल उके जखमी झाला. अपघाताची माहिती पवनी पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन जखमीला उपचाराकरीता रुग्णालयात पाठविण्यात आले.
घटनेचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनाकरीता ग्रामीण रुग्णालय पवनी येथे पाठविण्यात आले. दि.१९ जानेवारी रोजी मृतदेह शवविच्छेनानंतर मृतकाच्या कुटुुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले. (Pauni Accident) ट्रकचालक सागर मरगडे याचे तक्रारीवरुन पवनी पोलिसात मृतक आरोपी चालक विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास पोनि निलेश ब्राम्हणे यांचे मार्गदर्शनात पोउपनि रायपुरे करीत आहेत.