प्रयागराजच्या महाकुंभ मेळा परिसरात भाविकांच्या राहण्यासाठी तंबूंची व्यवस्थाही करण्यात आली आहे. यासाठी भाविकांना पैसे मोजावे लागतात. याच तंबूमधून आग लागल्याचे दिसून आले.
जगभरातील कोट्यवधी हिंदू भाविकाचे श्रद्धास्थान असलेल्या उत्तर प्रदेशातील महाकुंभ मेळात भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. प्रयागराज येथील सेक्टर -५ परिसरामध्ये रविवारी दुपारी भीषण अग्नितांडव पाहायला मिळालं. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू झालेत. सेक्टर ५ मध्ये सुरू झालेली आग हळूहळू सेक्टर १९ आणि २० मध्येही पसरली. जोरदार वाऱ्यामुळे आग वेगाने पसरली आणि आजूबाजूच्या तंबूंनाही वेढले. प्रयागराजच्या महाकुंभ मेळा परिसरात भाविकांच्या राहण्यासाठी तंबूंची व्यवस्थाही करण्यात आली आहे. यासाठी भाविकांना पैसे मोजावे लागतात. याच तंबूमधून आग लागल्याचे दिसून आले. या तंबूत जेवणाची आणि राहण्याची संपूर्ण व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत, तंबूत ठेवलेल्या सिलेंडरचा स्फोट झाल्यानंतर ही आग लागल्याची माहिती समोर येत आहे. माहितीनुसार एका सिलेंडरला आधी आग लागली नंतर हा आगीने विक्राळ रुप धारण केले. या आगीत अनेक सिलिंडरीचे स्फोट झाल्याने दहशतीचे वातावरण पसरले. या आगीत आठ ते नऊ सिलेंडरचा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळविले.
Published on: Jan 19, 2025 10:22 PM