जगात अनेक अजब गोष्टी घडत असतात. कारण जग अद्भूत आहे. रहस्यांनी भरलेलं आहे. त्यामुळे जगात कुठे काय घडेल आणि काय मिळेल याची शाश्वती नसते. जगातील अनेक गोष्टी तर प्रचंड आश्चर्यकारक आहेत. मानवी कल्पनेच्याही पुढच्या आहेत. आता अंटार्कटिकाचा ब्लड फॉल्स पाहिल्यावर असं वाटतं की रक्ताची नदी वाहत आहे. धबधब्यातून रक्त पडत आहे. पाणी लालच लाल दिसतं. कारण या पाण्यात आयरनची मात्रा अधिक असते. जेव्हा हे पाणी ऑक्सिजनच्या संपर्कात येते तेव्हा त्याचा रंग बदलून लाल होतो. तसंच आश्चर्य म्हणजे जापानचं कॅप्सूल हॉटेल. हे हॉटेल्स म्हणजे छोटे छोटे क्यूबिकल्स आहेत. त्यात केवळ एकच व्यक्ती राहू शकतो.
आपल्या साथीला प्रपोज करण्यासाठी पेंग्विन सुंदर आणि चमकदार दगडाची निवड करतो हे तुम्हाला माहीत आहे का? स्वीडिश माकड विविध प्रकारची फुलं आणि पत्ते गोळा करून आपल्या साथीला भेट म्हणून देतो हे माहीत आहे का? बदकं संगीत ऐकून आनंदीत होता हेही तुम्हाला माहीत नसेल. जगात आणि निसर्गात अशा असंख्य गोष्टी आहेत की ज्या आपल्याला माहीत नाही. पण त्या अत्यंत रोचक आहेत. लोकांना बुचकळ्यात पाडणाऱ्या आहेत.
अजब जग
आपल्या दृष्टीला मर्यादा आहे, तर जग हे अमर्याद आहे. या ठिकाणी अशा अनेक गोष्टी आहेत त्यामुळे डोके खाजवण्याशिवाय पर्याय नसतो. अकल्पनीय गोष्टी या ठिकाणी घडत असतात. आपल्याला विस्मय चकीत करतात. असंख्य प्रकारची फुले आहेत, फुलपाखरं आहेत. काही ठिकाणी धबधबे आहेत, तर काही ठिकाणी ज्वालामुखी आहेत. निसर्गाचा चमत्कारच असा आहे. अशाच काही गोष्टी आपण आज जाणून घेणार आहोत.
हे सुद्धा वाचा
अशी आहे आश्चर्यकारक दुनिया
माणसा परीस सायकल अधिक :
नेदरलँडमध्ये सायकलींची संख्या त्या देशाच्या लोकसंख्येहून अधिक आहे. या देशात प्रत्येक व्यक्तीकडे सरासरी 1.3 सायकली आहेत. हा देश सायकल चालवण्यासाठी प्रसिद्ध आहे. लोकांना सायकल व्यवस्थित चालवता यावी या हिशोबाने या देशातील रस्ते, पार्किंगस्थळं आणि विशेषतः सायकल लेनचे डिझाइन केलेले आहे. सायकलवर या देशात अधिक भर देतो. त्यामुळेच या देशातील लोकांचं आरोग्य अत्यंत चांगलं आहे, असं म्हटलं जातं.
सर्वात धाडसी प्राणी हनीबेजर :
हनीबेजरला सर्वात धाडसी प्राण्यांपैकी एक मानले जाते. हा प्राणी सिंहांशी देखील भिडण्याची हिम्मत ठेवतो. तो इतका धाडसी असतो की सिंह आणि विषारी सापांसोबतही लढतो. त्यांच्या आत्मविश्वास आणि चिकाटीमुळे त्याची “गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स” मध्ये सर्वात धाडसी प्राणी म्हणून नोंद झालेली आहे.
ऑक्टोपसचे तीन हृदये :
ऑक्टोपसला तीन हृदये असतात. जेव्हा ते पोहत असतात, तेव्हा त्याचे मुख्य हृदय बंद होते आणि उरलेले दोन हृदये काम करत असतात. हे सागरी जीवनाचे एक अद्भुत उदाहरण आहे.
चंद्रावर ध्वज :
जेव्हा मानवाने प्रथम चंद्रावर पाऊल ठेवले, तेव्हा तिथे अमेरिकेचा ध्वज लावला गेला होता. तो ध्वज आता पांढरा झालेला आहे. कारण सूर्याच्या किरणांमुळे त्याचे रंग फिके पडले आहेत. हे चंद्रावर मानवी उपस्थितीचे एक अनोखे प्रतीक आहे.
मानव मस्तिष्काची क्षमता :
मानव मस्तिष्काची क्षमता इतकी मोठी आहे. मानवी मस्तिष्क प्रत्येक सेकंदाला 1,000,000 पेक्षा जास्त माहिती प्रोसेस करू शकते. मानव मस्तिष्क एक अद्भुत रचना आहे, जी प्रत्येक सेकंदाला लाखो न्यूरॉन्सच्या माध्यमातून विद्युत आणि रासायनिक संकेतांचे आदानप्रदान करते.
जिराफची जीभ :
जिराफची जीभ इतकी लांब असते की ती त्याच्या कानांची साफसफाई देखील तो स्वत: करू शकतो. जिराफची जीभ सुमारे 45 सेंटीमीटर (18 इंच) लांब होऊ शकते. तो त्याच्या लांब जीभेचा वापर मुख्यतः झाडांवरून पानं आणि फांद्या खाण्यासाठी करतो, विशेषतः अशा झाडांवर ज्यांपर्यंत त्याची पोहोच नाही.
आयसलँडमध्ये मच्छर नाहीत :
आयसलँड हा असा देश आहे जिथे मच्छर नाहीत. याचे कारण तेथील हवामान आणि भौगोलिक परिस्थिती आहे. आयसलँडचा उत्तरेकडील हवामान आणि थंड वातावरण मच्छरांसाठी योग्य नाही. येथे मच्छरांसाठी योग्य वातावरण उपलब्ध नाही आणि त्यामुळे या ठिकाणी मच्छर नाहीत.