पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर पुरस्काराने सन्मानPudhari Photo
Published on
:
17 Nov 2024, 6:35 am
Updated on
:
17 Nov 2024, 6:35 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तीन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात रविवारी आफ्रिकन देश नायजेरियाला पोहोचले. पंतप्रधान मोदी यांचे विमान अबुजा, नायजेरिया येथे उतरले. तेथे त्यांचे नायजेरियन सरकारचे मंत्री न्यासोम इझेनवो वाइके यांनी जोरदार स्वागत केले. नायजेरिया सरकारच्या मंत्र्याने आदरार्थी म्हणून अबुजा शहराच्या चाव्या पंतप्रधान मोदींना दिल्या. खरे तर ही चावी नायजेरियातील जनतेने पंतप्रधान मोदींप्रती दाखविलेल्या आदर आणि विश्वासाचे प्रतीक आहे. (PM Narendra Modi )
Nigeria to honour Prime Minister Narendra Modi with its award- The Grand Commander of The Order of the Niger (GCON). Queen Elizabeth is the only foreign dignitary who has been awarded GCON in 1969. This will be the 17th such international award being conferred to PM Modi by a… pic.twitter.com/nOVKGyJr0a
— ANI (@ANI) November 17, 2024यानंतर आता नायजेरिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर (GCON) या पुरस्काराने सन्मानित करणार असल्याची माहिती समोर आली आहे. पंतप्रधान मोदींना देशाकडून प्रदान करण्यात येणारा हा 17 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार असेल. राणी एलिझाबेथ या एकमेव परदेशी मान्यवर आहेत, ज्यांना 1969 मध्ये हा द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर हा पुरस्कार मिळाला आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुसरे विदेशी असणार आहेत ज्यांचा या पुरस्काराने सन्मान होणार आहे. (PM Narendra Modi )