हिंगणा (Sameer Meghe) : भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा (Bhagwan Birsa Munda) या जननायकाचे नाव आद्यक्रमाने घ्यावे लागेल. वयाच्या अवघ्या पंचविशीत बलाढ्य ब्रिटिश राजवटीच्या विरुद्ध मूलनिवासींच्या हक्कांसाठी लढणाऱ्या या विद्रोही नायकाचे कार्य भारतभूमीत सदैव स्मरणीय राहील, अशी भावना हिंगणा विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर मेघे (Sameer Meghe) यांनी गोंडवानानगर, टाकळघाट व इसासनी येथे आयोजित भगवान बिरसा मुंडा जयंती उत्सवात केले.
या महोत्सवात प्रारंभी भगवान बिरसा मुंडा (Bhagwan Birsa Munda) यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी आ. मेघे (Sameer Meghe) यांनी उपस्थित आदिवासी बंधूभगिनींना जयंतीदिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला माजी आमदार आशीष ठाकूर, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते आतिश उमरे, बूथप्रमुख सतीश खैरकार, अर्चना गिरी, अंबादास उके, पुरुषोत्तम खेरगडे, सविता रवींद्र करनाके, लीलाधर पटले, अरविंद ढोणे, तुषार लोखंडे, इंदुबाई चौधरी, चंद्रशेखर राऊत, बाळा मडावी, लहानू जीवतोडे, मीना मेश्राम, जितू पटले, दादाराव मसराम, सतीश खैरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. मेघे यांची विक्तूबाबा देवस्थानाला सदिच्छा भेट
श्रीक्षेत्र टाकळघाट येथील विदेही संत विक्तूबाबा देवस्थानाला सदिच्छा भेट देत आमदार समीर मेघे (Sameer Meghe) यांनी समाधीचे दर्शन घेतले. या देवस्थानात कार्तिकी एकादशीनिमित्त मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती होती. यावेळी संस्थानचे अध्यक्ष नानाजी शामकुळे, भन्ते व विश्वस्तांनी देवस्थानच्यावतीने आ. मेघे यांचे स्वागत केले. या सदिच्छा भेटप्रसंगी आतिश उमरे, हरिचंद्र अवचट, उमेश कावळे, राजू बाजाईत, गौतम चंदनखेडे, रामभाऊ माथुरकर, किशोर गंधारे, ज्ञानेश्वर भगत, राजू भगत, निशांत बनसोड, गुलाब जांभुळकर, मिलिंद मेश्राम, केशव तभाने, हरीश बागडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.