बडकस चौकातील काँग्रेसची होर्डिंग काढल्याने तणाव file photo
Published on
:
17 Nov 2024, 8:30 am
Updated on
:
17 Nov 2024, 8:30 am
नागपूर : विधानसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या रोड शो'च्या निमित्ताने बडकस चौक परिसरात लावण्यात आलेले काही बॅनर, पोस्टर अज्ञात व्यक्तींनी रविवारी काढले. यानंतर काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तणावाची परिस्थिती असल्याने घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा पोहोचला.
भाजपवाले आमचे होर्डिंग काढू शकतात, मात्र लोकांच्या मनातून काढू शकत नाहीत, अशी टीका करत शेळके यांनी परिसरातील नागरिकांशी हस्तांदोलन करत आणि पाया पडून आपला अभिनव पद्धतीने प्रचार सुरूच ठेवला. दरम्यान काढण्यात आलेली बॅनर, होर्डिंग्ज अनधिकृत पद्धतीने लावण्यात आल्याने काढण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.