या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली नारायणगावचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी पोलीस उपनिरीक्षक सोमशेखर शेटे, जगदेव पाटील, पोलीस हवालदार संतोष कोकणे, तनुश्री घोडे, पोलीस शिपाई सत्यम केळकर, गोरक्ष हासे, सुभाष थोरात, सोमनाथ डोके, राम बनकर, नीलेश जाधव यांच्या पथकाची स्थापना केली.
गोपनीय माहिती व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या पथकाने भावड्या पथवे याला जेरबंद केले. त्याच्याकडून मंदिरातील दानपेटीतून चोरी केलेले एक हजार रुपये तसेच 86 हजार रुपये किमतीच्या चार दुचाकी हस्तगत केल्या. या चोरट्याकडून पोलिसांनी नारायणगाव, आळेफाटा तसेच रांजणगाव पोलिस ठाणे हद्दीतील चोरीचे चार गुन्हे उघडकीस आणले.