सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, ३ संशयित पोलिसांच्या जाळ्यातFile Photo
Published on
:
19 Jan 2025, 7:13 am
Updated on
:
19 Jan 2025, 7:13 am
Pune Crime: पुणे पोलिसांनी सायबर फ्रॉड करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. नेपाळच्या 2 आरोपींसह तामिळनाडूमधील 1 अशा एकूण 3 आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी केलेल्या तपासात ही टोळी आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारांसाठी काम करत असल्याचं निष्पन्न झालंय. या टोळीने 68 लाखांच्या गैरव्यवहारांसह 50 अकाउंट वरून 13 कोटी रुपयांची उलाढाल केल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणी कोथरूड पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तपासाला सुरूवात केली. पोलीस तपासात एकूण ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. लाचीन शेर्पा (नेपाळ),बिन बहादूर प्रधान (नेपाळ), तर रमेश कुमार अभिमन्यू (तमिळनाडू) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 7 मोबाईल,अनेक बँकांचे पासबुक, चेकबुक, यासह बनावट पासपोर्ट देखिल पुणे पोलिसांकडून जप्त करण्यात आले आहेत. याआधी या आरोपींनी मुंबई पुण्यासह बेंगलोरमध्येही अनेकांची फसवणूक केल्याचे पोलीस तपासातून निष्पन्न झाल आहे.