परभणीच्या पूर्णा तालुक्यातील चुडावा रोडवर शनिवारी रात्री अपघात
दोघे जखमी
परभणी/पूर्णा (Purna Accident) : तालुक्यातील चुडावा – पूर्णा रोडवर शनिवार ११ जानेवारी रोजी वसमत फाट्याजवळ झालेल्या अपघातात दुचाकीवरील मायलेकीचा मृत्यू झाला. इतर दोघेजण जखमी झाले. ट्रॅक्टर, दुचाकीचा हा अपघात शनिवारी रात्री ८.३० च्या सुमारास घडला.
या (Purna Accident) अपघाताविषयी अधिक माहिती अशी की, पूर्णा तालुक्यातील चुडावा येथील महिलेला तिचा भाऊ एम.एच. २२ – बी.बी. ८०४८ या दुचाकीने चुडाव्यावरुन नांदेडच्या दिशेने कलमुला येथे सासरी घेऊन जात होता. यावेळी सोबत दोन लहान मुली देखील होत्या. वसमत फाट्याजवळ एम.एच. २६ – बी.क्यु. ३७९९ या ट्रॅक्टर सोबत दुचाकीचा अपघात झाला.
या अपघातात स्वाती बालाजी लेंडगे (वय २५ वर्ष) व त्यांची एक पाच वर्षाची मुलगी मयत झाली. तर दुसरी तीन वर्षाची मुलगी आणि मोटारसायकल चालक रितेश देसाई यांनाही मार लागला. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. (Purna Accident) अपघाताची माहिती कळताच चुडावा पोलिस ठाण्याचे सपोनि. नरसिंग पोमनाळकर घटनास्थळी दाखल झाले. घटनेची चुडावा पोलिसात नोंद घेण्यात आली आहे. मात्र गुन्हा दाखल झालेला नव्हता.