नागपूर येथे युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख मोहन भागवत यांच्या निषेधार्थ मोर्चा काढला होता. मोहन भागवत यांनी केलेल्या विधानाच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला होता. शहरातील देवडिया कॉंग्रेस भवनमधून निघत कार्यकर्त्यांनी संघ मुख्यालयाच्या दिशेने मोर्चा काढला. मात्र, परवानगी नसलेल्या या मोर्चाला पोलिसांनी मध्येच रोखले आहे. अयोध्येत 22 जानेवारी 2024 रोजी श्री रामाची प्राणप्रतिष्ठा झाली तेव्हा देश खऱ्या अर्थाने मुक्त झाला, असे विधान सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले होते. त्यांच्या या विधानाच्या निषेध म्हणून युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हा मोर्चा काढला होता. संघाने आधी ध्वजाचा अवमान केला, आता स्वातंत्र्याचा अपमान करत आहे, अशा आशयाचे बॅनर घेऊन कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. यावेळी संघावर बंदी घालण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. संघाच्या मुख्यालयाच्या दिशेने निघालेल्या या मोर्चाला पोलिसांनी वेळीच रोखले. गोंधळ होण्याची शक्यता लक्षात घेत पोलिसांनी ही कारवाई केली. मात्र, कार्यकर्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने शेवटी पोलिसांना बाळाचा वापर करावा लागला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत उपस्थित होते. तसेच युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदयभानू चीब यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. काय म्हणाले होते मोहन भागवत? राम मंदिरात प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा भारताचे खरे स्वातंत्र्य आहे. प्रभू रामचंद्रांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा दिवस हा प्रतिष्ठा द्वादशी म्हणून साजरा करायला हवा. हे अनेक शतकांच्या परकीय आक्रमणानंतर भारताच्या स्वायत्ततेच्या स्थापनेचे प्रतीक आहे. राम मंदिर आंदोलन हे कोणाच्या विरोधात म्हणून नव्हते तर भारताच्या 'स्व'ला जागवण्याचा प्रयत्न होता. भारत देश म्हणून स्वतंत्र उभा राहावा आणि जगाला मार्गदर्शन करू शकेल यासाठीची धडपड होती, असे मोहन भागवत म्हणाले होते.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)