तब्बल 105 दिवसांनंतर ‘बिग बॉस 18’चा ग्रँड फिनाले प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिनेता सलमान खानच्या सूत्रसंचालनामुळे या शोची लोकप्रियता सर्वाधिक आहे. गेल्या दहा वर्षांहून अधिक काळापासून सलमान या शोचं सूत्रसंचालन करतोय. यासाठी त्याला निर्मात्यांकडून तगडी फी मिळते. बिग बॉसच्या अठराव्या सिझनसाठी सलमानने भरभक्कम मानधन घेतल्याचं कळतंय. ‘बिग बॉस 18’चा ग्रँड फिनाले आज (19 जानेवारी) रात्री 9.30 वाजल्यापासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. सहा स्पर्धकांनी फिनालेपर्यंत बाजी मारली असून त्यापैकी एक जण बिग बॉसची ट्रॉफी आपल्या नावे करणार आहे. या सहा स्पर्धकांमध्ये विवियन डिसेना, रजत दलाल, करणवीर मेहरा, अविनाश मिश्रा, चुम दरांग आणि इशा सिंह यांचा समावेश आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमान खानने ‘बिग बॉस 18’च्या सूत्रसंचालनासाठी प्रत्येक महिन्याला 60 कोटी रुपयांचं मानधन स्वीकारलं आहे. यामुळे तो टेलिव्हिजनवरील सर्वाधिक मानधन घेणारा स्टार ठरला आहे. महिन्याला 60 कोटी रुपये यानुसार 15 आठवड्यांसाठी ही रक्कम तब्बल 250 कोटी रुपयांपर्यंत पोहोचते. सलमान खानचं हे मानधन काही भारतीय ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या बजेटपेक्षाही अधिक आहे. एस. एस. राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली’ या चित्रपटाचा बजेट 180 कोटी रुपयांचा होता. तर शाहरुख खानच्या ‘डंकी’चा बजेट 120 कोटी रुपये इतके होता. रजनीकांत यांचा ‘जेलर’ हा चित्रपट 200 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनला होता.
हे सुद्धा वाचा
Chhid chuki hai Bigg Boss 18 finale ki jung, dekhna hai kaun maarega baazi.
Dekhiye #BiggBoss18 #GrandFinale, Aaj raat baje, sirf #Colors aur @JioCinema par.@bellavita_org #Vaseline @Parle2020cookie #ChingsSecret #Harpic @BergerPaintsInd #GoCheese #BiggBoss18 #BiggBoss… pic.twitter.com/PCFrnetoy7
— ColorsTV (@ColorsTV) January 19, 2025
टेलिव्हिजनवरील इतर स्टार्सची तुलना केल्यास सलमानला मिळालेली ही रक्कम कितीतरी पटींनी अधिक आहे. कॉमेडियन कपिल शर्माने नेटफ्लिक्सच्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’साठी तब्बल 60 कोटी रुपये मानधन घेतल्याचं म्हटलं जातं. तर ‘कौन बनेगा करोडपती’ या शोसाठी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चनसुद्धा चांगली रक्कम आकारतात. मात्र तो आकडासुद्धा सलमानच्या मानधनापेक्षा कमीच असल्याचं कळतंय.
सलमान खान गेल्या 15 वर्षांपासून या शोचं सूत्रसंचालन करतोय. या शोच्या काही सिझनचं सूत्रसंचालन अभिनेता अर्शद वारसी आणि अमिताभ बच्चन यांनीसुद्धा केलं होतं. मात्र सलमानमुळे हा शो देशभरात प्रचंड लोकप्रिय झाला. त्याचा ‘वीकेंड का वार’ एपिसोड पाहण्यासाठी प्रेक्षक आतूर असतात. वीकेंड का वार या एपिसोडमध्ये सलमान कोणत्या स्पर्धकांची शाळा घेणार आणि कोणाचं कौतुक करणार, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात.