केंद्राकडून अनुदान न आल्याने शेतकऱ्यांनाही मिळाले नाही:कृषीमंत्री कोकाटे स्पष्टच बोलले, म्हणाले - अजितदादांनी तरतूद केल्यास दिले जाईल
3 hours ago
1
शेतकऱ्यांना अनेक योजनांचे अनुदान अद्यापपर्यंत मिळालेले नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. सरकारकडून अनुदान कधी मिळणार? याची वाट शेतकरी पाहत आहेत. यावर राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी प्रतिक्रिया दिली. केंद्र सरकारकडून अनुदान न आल्याने शेतकऱ्यांना देऊ शकलो नाही, अशी खदखद कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केली. अजित पवारांनी काही तरतूद केली, तर पुढील आठवड्यात अनुदान दिले जाईल, असेही ते म्हणाले. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत विविध विषयांवर भाष्य केले. शेतकऱ्यांसाठी अजित पोर्टल सुरू करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या नाराजीवरही आपले मत मांडले. काय म्हणाले माणिकराव कोकाटे?
केंद्र सरकारच्या अनेक योजनांचे अनुदान आहेत, पण ते मिळत नाही. केंद्राकडून अनुदान न आल्याने शेतकऱ्यांना देऊ शकलो नाही. अजितदादांनी काही तरतूद केली, तर पुढील आठवड्यात शेतकऱ्यांना देणार आहे. पर्वा अजित पवार यांच्यासोबत बैठक असणार आहे, असे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले. शेतकऱ्यांसाठी अजित पोर्टल
पुढे बोलताना माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांसाठीच्या अजित पोर्टलबाबत माहिती सांगितली. आम्ही शेती विभागात सुरळीतपणा आणि पारदर्शकपणा आणण्यासाठी प्रयत्न करत असून शेतकऱ्यांसाठी अजित पोर्टल सुरू करणार आहे. हे पोर्टल आयआयटीचे विद्यार्थी तयार करत आहेत. लवकरच ते लॉन्च केले जाईल, असे कोकाटे यांनी सांगितले. भुजबळांनी पक्ष नेतृत्वावर टीका टिपणी करू नये
माणिकराव कोकाटे यांनी छगन भुजबळ यांच्या नाराजीवरही भाष्य केले. भुजबळांच्या नाराजीवर भाष्य करायचे मी बंद केले आहे. त्यांच्याबाबती वरीष्ठ पातळीवर निर्णय होतील, असे ते म्हणाले. भुजबळांनी पक्ष नेतृत्वावर टीका टिपणी करू नये एवढीच माझी अपेक्षा आहे, असे म्हणत त्यांनी छगन भुजबळांना सल्ला दिला. नंदुरबारमध्ये आदिवासींच्या हिताचे निर्णय घेणार
माणिकराव कोकाटे यांच्या नंदूरबार जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. याविषयी त्यांना विचारले असता, नंदुरबारला मी याआधी नंदुरबारला कधीच गेलो नाही, त्यामुळे तेथील समस्या काय आहे याबाबत माहिती नाही. पालकमंत्री पद मिळाल्याने समस्या समजून घेऊन सोडवणार असून आदिवासींच्या हिताचे निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. पहाटेच्या शपथविधीबाबत कल्पना नव्हती
पुढे बोलताना माणिकराव कोकाटे यांनी धनंजय मुंडेंनी पहाटेच्या शपथविधी बाबत केलेल्या विधानावरही प्रतिक्रिया दिली. पहाटेचा शपथविधी बाबत धनंजय मुंडे यांना महिती होते, पण मला तेव्हा त्याची कल्पना नव्हती. तेव्हा अजितदादांनी मला तुझ्याशी बोलायचे आहे असे सांगितले होते. शपथ विधी आहे हे माहिती नव्हते. अजितदादांनी जो निर्णय घेतला आम्हाला मान्य आहे,आम्ही तेव्हाही दादा बरोबर होतो आजही आहे आणि उद्या ही राहणार आहोत, असे माणिकराव कोकाटे म्हणाले.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)