मुरूड : सकाळच्या टप्प्यातच मतदार रांगा लाऊन मतदान करताना दिसून आले. त्यातही महिला मतदारांचे प्रमाण अधिक होते.(छाया : सुधीर नाझरे)
Published on
:
21 Nov 2024, 6:50 am
Updated on
:
21 Nov 2024, 6:50 am
रायगड : रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदार संघात बुधवारी (दि.20) सकाळी सात वाजता मतदानास प्रारंभ झाला. रायगडमध्ये सर्वसाधारणपणे सकाळच्या टप्प्यात मतदानाचा वेग कमी असतो, मात्र यावेळी सकाळच्या टप्प्यातच मतदार रांगा लाऊन मतदान करताना दिसून आले. आणि त्यातही महिला मतदारांचे प्रमाण अधिक होते.
दरम्यान रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदार संघांपैकी श्रीवर्धन, पेण आणि पनवेल या तिन विधानसभा मतदार संघात झालेले मतदान सरासरी असल्याचे दिसून येत आहे तर अलिबाग, महाड, ठरण आणि कर्जत विधानसभा मतदार संघात मतदानात वाढ झाल्याचे दिसून येत असून वाढाव मतदानाचा नेमका कोणाला धक्का बसणार असा प्रश्न राजकीय विश्लेषकांनी उपस्थित केला आहे. बुधवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत रायगड जिल्ह्यात ६१.०१ टक्के मतदान झाले होते. येथे अंतिम मतदान ७० टक्के होईल असा प्राथमिक अंदाज आहे. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत रायगड जिल्ह्यात ६१.०१ टक्के मतदान झाले होते. या मतदार संघात अंतिम मतदान ७० टक्के होईल, असा प्राथमिक अंदाज आहे. अलिबाग, महाड, उरण आणि कर्जत या चार विधानसभा मतदार संघात मतदानात वाढ झाल्याचे दिसून येत असून, वाढीव मतदान कोणाच्या पदरात पडणार त्यावर निकाल अवलंबून असल्याचा दावा राजकीय निरिक्षकांनी केला आहे. श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात संधाकाळी पाच वाजे पर्यंत ५७.७२ टक्के मतदान झाले आहे. यामध्ये अतिंमता एक दोन टक्के वाढ होणे अपेक्षीत आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेस-अजित पवार गटाच्या विद्यमान आमदार व मंत्री आदिती तटकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार गटाचे अनिल नवगणे यांच्यात लढत झाली. खासदार सुनिल तटकरे यांचा श्रीवर्धन हा बालेकिल्ला आहे.
वाढीव मतदान कोणाला धक्का देणार, राजकीय विश्लेषकांना उत्सूकता
भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या पनवेल विधानसभा मतदार संघात संध्याकाळी पाच वाजे पर्यंत ५२.०९ टक्के मतदान झाले आहे. येथे अंतिम मतदान ५५ ते ५८ टक्के होणे अपेक्षीत आहे. येथे भाजपाचे विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर यांना शेकापचे बाळाराम पाटील आणि शिवसेना-ठाकरे गटाच्या लिना गरड यांनी आव्हान दिले होते.
भाजपाचा दुसरा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पेण मध्ये संध्याकाळी पाच बाजे पर्यंत ६१.८० टक्के मतदान झाले आहे. येथे अंतिम मतदानात २ ते ३ टक्के मतदान वाढेल असा अदाज आहे. भाजपाचे विद्यमान आमदार रवींद्र पाटील यांनी शेकापचे अतूल म्हात्रे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रसाद भोईर यांनी आव्हान दिले होते. या मतदार संघात असलेले भाजपाचे खासदार धैर्यशिल पाटील यावेळी रवीपाटील यांच्या सोबत होते, त्यामुळे भाजपाची येथे बाजू भक्कम झाली होती.
अलिबाग विधानसभा मतदार संघात सर्वाधिक ६७.६० टक्के मतदान झाले असून येथे अंतिम मतदान ७० टक्के होईल असा अंदाज आहे. येथे शिवसेना शिदें गटाचे विद्यमान आमदार महेंद्र दळवी, महाविकास आघाडीतील शेकापच्या चित्रलेखा नृपाल पाटील आणि भाजपा बंडखोर अपक्ष दिलीप भोईर यांच्यात अत्यंत चुरशीची लढत झाली.
कर्जत विधानसभा मतदार संघात मध्ये सध्याकाळी पाच वाजेपर्यंत ६५.८० टक्के मतदान झाले आहे, यामध्ये वाढ होऊन अंतिम मतदान ७० टक्के होईल असा अंदाज आहे. या मतदार संघात शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांना शिवसेना-ठाकरे गटाचे नितीन सावंत आणि राष्ट्रवादी काँग्रेस-अजित पवार गटाचे बंडखोर उमेदवार सुधाकर घारे यांनी मोठे आव्हान दिले होते. येथे अत्यंत चुरशीची लढत झाली आहे.
महाड विधानसभा मतदारसंघात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ६४.०४ टक्के मतदान झाले असून येथे अंतिम मतदान वाढून ७० टक्के होईल अंदाज आहे. या मतदार संघात शिवसेना-शिंदे गटाचे विद्यमान आमदार भरत गोगावले आणि शिवसेना-ठाकरे गटाच्या स्नेहल जगताप यांच्यात अत्यंत चुरशीची काटेकी टक्कर झाली झाली आहे.
उरण विधानसभा मतदार संघामध्ये संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ६६.८४ टक्के मतदान झाले असून येथे अंतिम मतदान ७२ ते ७३ टक्केपर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे. या मतदार संघात भाजपाचे विद्यमान आमदार महेष बालदी, शिवसेना ठाकरे गटाचे मनोहर भोईर आणि शेकापचे प्रितम जे. एम. म्हात्रे यांच्या अत्यंत चुरशीची तिरंगी लढत झाली आहे.