Published on
:
26 Nov 2024, 6:25 am
Updated on
:
26 Nov 2024, 6:25 am
रायगड | हवामानाचे चक्र पून्हा एकदा बदलत असून, आगामी 5 दिवस कडाक्याच्या थंडीचा इशारा असतानाच, 27 नोव्हेंबरपासून पुन्हा पावसाळी वातावरण तयार होणार असल्याचा माहिती हवामान विभागाने दिली आहे. 27 ते 30 नोव्हेंबर दरम्यान राज्यात काही ठिकाणी पाऊस किंवा ढगाळ हवामानाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. परिणामी आंबा बागायतदार काहीसे धास्तावले आहेत. यंदा थंडी उशीरा सुरु झाल्याने आब्यांचा मोहोर देखील उशीराने फूटत आहे. मोहोर येण्याच्या काळातच पाऊस आला तर मोहोराचे नुकसान होण्याची शक्यता अलिबागमधील आंबा बागायतदार विश्वनाथ म्हात्रे यांनी दिली आहे.
यंदा दिवाळीच्या काळामध्ये झालेल्या पावसामुळे कोकणातील शेतकर्यांचे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पाऊस दिवाळी पर्यंत लांबल्याने यंदा थंडीला देखील उशिराने सुरुवात झाली आहे. राज्यात काही ठिकाणी कडाक्याची थंडी पडायला सुरुवात झाली, त्यात राज्यातील उत्तर महाराष्ट्र विभागात थंडीचे प्रमाण हे इतर विभागापेक्षा अधिक आहे. रब्बी हंगामातील पिकांना देखील पोषक परिस्थिती तयार झाल्याचे दिसून येत आहे. अशातच आता हवामान खात्याने दिलेल्या अंदाजमध्ये राज्यात 27 नोव्हेंबर पासून पुन्हा एकदा पावसाळी वातावरण तयार होईल असं सांगितले आहे.
27 ते 30 नोव्हेंबर दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानाची आणि पावसाची शक्यता आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीची तीव्रता कमी होईल असा अंदाज आहे, भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजमध्ये हरियाणा, पंजाब, आणि राजस्थानमध्ये हवेचे उच्च दाबाचे क्षेत्र तयार होत असून ते महाराष्ट्रकडे येणार्या थंड कोरड्या वार्याचा परिणाम म्हणून थंडीत वाढ दिसून येऊ शकते.
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानाची आणि पावसाची शक्यता आहे. 27 नोव्हेंबर पासून राज्यांमध्ये कडाक्याच्या थंडीला काहीशी विश्रांती मिळणार आहे असा देखील अंदाज आहे. 27 ते 30 नोव्हेंबर दरम्यान राज्यातील सातारा, सोलापूर, सांगली आणि सोबतच कोल्हापूर, मराठवाडा, या ठिकाणी धाराशिव, लातूर, नांदेड, जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहील अशी स्थिती भारतीय हवामान खात्याने वर्तवीली आहे. सोबतच या ठिकाणी 3 ते 4 दिवसाच्या पावसाळी वातावरण असून या ठिकाणी पुन्हा एकदा राज्यात थंडीची तीव्रता वाढणारे तरी थंडीची तीव्रता 30 नोव्हेंबरनंतर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे.
रायगड जिल्ह्यात भातकापणी नंतर वाल आणि पाढर्या कांद्याची लागवड करण्यात येते. त्याच बरोबर काही तालुक्यांमध्ये भाजीपाली केपला जातो. वाल आणि पांढर्या कांद्यासाठी थंडी पोषक असते मात्र, पाऊस झाला तर विपरित परिणाम होऊ शकतो अशी माहिती शेतकर्यांनी दिली आहे.