हिंगोली (Ramdas Patil Sumathankar) : भारतीय जनता पक्षाचे लोकसभा प्रचार प्रमुख राहिलेले रामदास पाटील सुमठाकर यांनी शनिवारी अजीत पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश घेतला. राज्य शासनाच्या नगर विकास विभागात सेवेत असलेले रामदास पाटील सुमठाणकर (Ramdas Patil Sumathankar) यांनी चार वर्षापूर्वी नगर पालिकेच्या मुख्याधिकारी पदावरून शासकीय सेवेचा राजीनामा दिला.
भारतीय जनता पक्षात पूर्ण वेळ काम करण्यासाठी त्यांनी शासकीय नोकरी सोडली. भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतल्यानंतर पक्षा तर्फे त्यांच्यावर अनेक महत्वाच्या जवाबदार्या टाकण्यात आल्या. प्रामुख्याने लोकसभा प्रवास योजनेचे संयोजक पद त्यांच्याकडे होते. या पदावर राहून (Ramdas Patil Sumathankar) सुमठाणकरांनी हिंगोली लोकसभा मतदार संघात मतदान केंद्र पातळीपर्यंत समर्पित कार्यकर्त्यांची फळी तयार केली. मतदार संघात त्यांनी निर्माण केलेल्या दांडग्या जनसंपर्कामुळे लोकसभेची उमेदवारी त्यांना देण्यात यावी अशी अनेक कार्यकर्त्यांची मागणी होती. महायुती अंतर्गत ही जागा अजीत पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला गेली. त्यावेळी सुमठाणकरांनी लोकसभेसाठी अपक्ष अर्ज दाखल केला होता. पक्ष श्रेष्ठींनी सांगितल्यावरून त्यांनी अर्ज मागे घेतला. यानंतर त्यांनी हिंगोली विधानसभेची मागितली होती. विधानसभेत ही उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी बंडखोरी करून अपक्ष निवडणुक लढविली होती.
राज्यात सत्ता स्थापन झाल्यानंतर रामदास पाटील काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान शनिवारी त्यांनी शिर्डी येथे उपमुख्यमंत्री अजीत पवारांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. यावेळी त्यांच्या सोबत आ.प्रताप पाटील चिखलीकर व आ.राजु भैय्या नवघरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बि.डी बांगर हे उपस्थित होते. लवकरच हिंगोलीत ना.अजीत पवारांच्या उपस्थितीत मोठा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमात अनेक कार्यकर्त्यांचा प्रवेश होणार असल्याचे रामदास पाटील (Ramdas Patil Sumathankar) यांनी देशोन्नतीशी बोलतांना सांगितले.
प्रकाश थोरात यांचाही राष्ट्रवादीत प्रवेश
काँग्रेस पक्षाचे नेते प्रकाश दत्तराव थोरात यांनी ही याच कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. प्रकाश थोरात यांनी विधानसभेची निवडणूक वंचित बहुजन आघाडी तर्फे लढविली होती. प्रकाश थोरात यांनी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागितली होती. यापूर्वी ते भारतीय जनता पक्षात ही होते.