Sonpeth police Crime: परभणीच्या मुख्याध्यापकाला मागितली दहा लाखाची खंडणी

2 hours ago 1

शाळा चालवू न देण्याची धमकी?

परभणी/सोनपेठ (Sonpeth constabulary Crime) : शाळा व्यवस्थित चालवायची असेल तर मला दहा लाख रुपये द्या नाहीतर तुमची शाळा चालू देणार नाही, अशी धमकी देत मुख्याध्यापकाला खंडणीची मागणी करण्यात आली. हा प्रकार (Sonpeth constabulary Crime) सोनपेठ तालुक्यातील मुन्शीराम तांडा येथे घडला. सदर प्रकरणी एकावर ९ ऑक्टोबर रोजी सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक अंकुश जाधव यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादी हे वैâ. मानसिंग नाईक इंग्रजी प्राथमिक उच्च माध्यमिक शाळेत मुख्याध्यापक आहेत.

परभणीतील सोनपेठ पोलिसात गुन्हा दाखल

फिर्यादी शाळेत असताना तेथे प्रशांत कमलाकर मुळे हा आला. त्याने आपली ओळख सांगितली. त्यानंतर संबंधिताने तुम्ही एवढे पैसे कमवित आहात, मला दहा लाख रुपये द्या, असे म्हणाला. फिर्यादीने कशाचे दहा लाख रुपये द्यायचे, असे उत्तर दिल्यावर प्रशांत मुळे याने शाळेतील मुलाचे अपहरण करुन त्यांच्या अपहरणाचा तुमच्यावर आरोप करतो, राज्यभर तुमच्या विरुध्द आंदोलन करुन तुमची शाळा बंद पाडतो, अशी धमकी दिली. शाळा व्यवस्थित चालवायची असेल तर दहा लाख रुपयांची मागणी करत खंडणी मागितले. यावेळी शाळेतील कर्मचार्‍यांनी संबंधिताला समजावून सांगितले. त्यानंतर तो निघून गेला. खंडणीची मागणी केल्या प्रकरणी प्रशांत कमलाकर मुळे याच्यावर (Sonpeth constabulary Crime) सोनपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article