Sudhir Mungantiwar: बल्लारपूर विधानसभेच्या ‘पावरफुल्ल’ विकासासाठी सुधीरभाऊंना साथ द्या

2 hours ago 1

उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचे जनतेला आवाहन

देशोन्नती वृत्तसंकलन
बल्लारपूर (Sudhir Mungantiwar) : ज्या बल्लारपूरच्या सागवनाने अयोध्येतील राम मंदिराचा कोपरा न कोपरा सुगंधीत झाला, त्या बल्लारपूरचा विकास बघून मी थक्क झालो. त्यामुळे ‘बाहुबली’ चित्रपटात ज्याप्रमाणे बाहुबलीने राजमाता शिवगामीची पावले थांबू दिली नाहीत, त्याचप्रमाणे तुम्ही देखील (Sudhir Mungantiwar) सुधीरभाऊंच्या नेतृत्वात विकासाचे पाऊल थांबू देऊ नका. बल्लारपूरच्या ‘पॉवरफुल्ल विकासासाठी सुधीरभाऊंना अभूतपूर्व मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि तेलगू सुपरस्टार पवन कल्याण (Pawan Kalyan) यांनी केले.

बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप-महायुतीचे उमेदवार ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ डब्ल्यूसीएल कॉलनी मैदानावर पवन कल्याण (Pawan Kalyan) यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेला हजारोंच्या संख्येने लोकांची उपस्थिती होती. (Pawan Kalyan) पवन कल्याण म्हणाले, ‘सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या विकासाच्या दृष्टीने बल्लारपूरचा प्रवास सर्वांगीण विकासाच्या दिशेने ने सुरू आहे.

एसडीओ किंवा तहसील कार्यालय असो वा विमानतळासारखे बसस्थानकाचा निर्माण असो, येथील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविणे असो किंवा जातीपाती भेद न करता समाजातील प्रत्येक घटकाची सेवा करणे असो. सुधीरभाऊंनी प्रत्येक क्षेत्रात काम केले. त्यामुळे त्यांनी केलेली कामे लक्षात ठेवा आणि येत्या २० नोव्हेंबरला मतदान करून प्रचंड मतांनी त्यांना विजयी करा. ‘सुधीरभाऊंनी चंद्रपूरला एसएनडीटी, स्व. सुषमा स्वराज कौशल्य विकास केंद्र मतदारसंघात आणून मोठे काम केले आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी सुधीरभाऊंनी अत्यंत महत्त्वाचे पाऊल यांनी ना. मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या योगदानाचे टाकले आहे, या शब्दांत पवन कल्याण कौतुक केले.

तेलगूसह मराठीतही भाषण

पवन कल्याण (Pawan Kalyan) यांनी तेलगूसह मराठीतही भाषण केले. सुरुवातीला त्यांनी ‘जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र’ असा जयघोष केला. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींनाही त्यांनी मराठीतच अभिवादन केले.’ माझे मराठी शिकण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मी मराठी बोलताना चुकलो तर मला क्षमा करा. पांडुरंगाच्या वारीची परंपरा असणाऱ्या या महाराष्ट्रात मला प्रचारवारीसाठी येता आले, याचा आनंद आहे, ‘अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.

बल्लारपूर विधानसभेच्या विकासासाठी कटिबद्ध

बल्लारपूरसाठी तहसील कार्यालय, एसडीओ, ग्रामीण रुग्णालय उभारले. नगर परिषदेची इमारत बनवत आहे. बसस्टॅण्ड, सैनिक स्कुल, स्टेडियम, जलतरण केंद्र, नाट्य गृह, डिजीटल स्कुल बांधले. स्व. सुषमा स्वराज स्किल सेंटरची निर्मिती केली. यापुढेही बल्लारपूर मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध राहील, अशी ग्वाही ना. सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी दिली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article