Tata कंपनीला टक्कर देणार Mahindra, लाँच केली इलेक्ट्रीक कार, जाणून घ्या किंमत

2 hours ago 2

भारतीय बाजारपेठेत अनेक मोठ्या कंपन्यांनी इलेक्ट्रिक कार लाँच केल्या आहेत. त्यात टाटा कंपनी आणि महिंद्रा कंपनी यांचा ग्राहक वेगळा असतो. एसयूव्ही सेगमेंटमध्ये दबदबा असणारी महिंद्रा अँड महिंद्रा आता इलेक्ट्रिक कार मार्केटमध्ये आपली दमदार उपस्थिती निर्माण करणार आहे. महिंद्राने मंगळवारी आपल्या २ नवीन इलेक्ट्रिक कार लाँच केल्या आहेत. ही त्याच्या इलेक्ट्रिक कार पोर्टफोलिओमध्ये नवीनतम भर आहे आणि ही त्याची बॉर्न इलेक्ट्रिक एसयूव्ही आहे, याचा अर्थ या कार संकल्पना स्तरावरून इलेक्ट्रिक कार म्हणून विकसित केल्या गेल्या आहेत.

महिंद्राने Mahindra XEV 9e आणि Mahindra BE 6e या दोन इलेक्ट्रिक कार लाँच केल्या आहेत. यासाठी चेन्नईत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यासह आता इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये त्यांची थेट स्पर्धा टाटा मोटर्सशी होणार आहे. कारण सध्या इलेक्ट्रिक कार मार्केटमध्ये टाटा मोटर्सचा दबदबा आहे.

सिंगल चार्जमध्ये ५०० किमीपर्यंत जाणार

भारतीय बाजरपेठेत महिंद्रा अँड महिंद्राने दोन्ही इलेक्ट्रिक कार लाँच केल्या आहेत. तर या कारची डिझाईन बऱ्यापैकी आंतरराष्ट्रीय ठेवण्यात आली आहे. या कारची मस्क्यूलर बॉडी आहे. बीई 6 ई मध्ये 59 किलोवॅट आणि एक्सईव्ही 9 ई मध्ये 79 किलोवॅट बॅटरी पॅक देण्यात आलेली आहे. ही कार सिंगल चार्जमध्ये ४०० ते ५०० किलोमीटरची रेंज देईल. तर या कारमध्ये 20 ते 80 टक्के चार्जिंग केवळ 20 मिनिटांत होणार आहे.

महिंद्राच्या या कार INGLO प्लॅटफॉर्मवर विकसित करण्यात आल्या आहेत. हा प्लॅटफॉर्म अतिरिक्त सुरक्षा प्रदान करतो. XEV 9e ची लांबी 4.789 मीटर असेल. तर तिचा ग्राउंड क्लीयरन्स 207 मिमी असेल. यात 663 लीटरची बूट स्पेस आणि 150 लीटरची फ्रंक (समोर बूट स्पेस उपलब्ध) असेल. तर BE 6e ची लांबी 4.371 मीटर असेल. तिचे ग्राउंड क्लीयरन्स देखील 207 मिमी असेल. यात 455 लिटरची बूट स्पेस आणि 45 लिटरची ट्रंक स्पेस असेल.

99.5 टक्के UV किरणांपासून सुरक्षा

कंपनीने कारच्या लूकसह ग्राहकांच्या आरोग्याचीही काळजी घेतली आहे. कार सूर्यप्रकाशातील अतिनील किरणांपासून (UV Rays) संरक्षण करेल अशाप्रकारे तयार करण्यात आली आहे. कंपनीने या कारच्या विंडशील्ड, छतावरील काच आणि साइड ग्लासवर यूव्ही संरक्षण कोटिंग केले आहे. यामुळे, ही कार यूव्ही किरणांपासून 99.5 टक्के संरक्षण करते.

यामुळे कार केबिन लवकर थंड होण्यास मदत होते. कंपनीचे म्हणणे आहे की या वैशिष्ट्यामुळे कारचे केबिन सामान्य कारच्या तुलनेत 40 टक्के वेगाने थंड होते.

मॉडर्न फीचर्स

महिंद्रा कंपनीने या कार नव्या कन्झ्युमर बेससाठी सादर केल्या आहेत. म्हणूनच त्यांचा लोगो एकदम वेगळा असून पूर्ण लुक हा इन्फिनिटी सारखा दिसतो. या कारमध्ये तुम्हाला ज्वेलसारखे हेडलॅम्प्स, ग्लोइंग लोगो, एंड २ एंड टेललाइट्स सारखे पर्याय मिळतील. यामध्ये एक्सईव्ही 9 ई मध्ये ओपन सनरूफ मिळेल, तर बीई 6 ई मध्ये तुम्हाला मोठे फिक्स्ड ग्लास रूफ मिळेल.

या गाड्यांचं इंटिरिअर आणि एक्स्टिरिअर मिनिमलिस्ट ठेवण्यात आले आहेत. यात 2-स्पोक स्टीयरिंग व्हील मिळतीतल. केबिनमध्ये हवामान नियंत्रण, हवेशीर फ्रंट सीट, अँड्रॉइड ऑटो, ऍपल कार प्ले, पॉवर्ड फ्रंट सीट, वायरलेस मोबाइल चार्जिंग, ॲम्बियंस लाइटिंग, छतावर स्टारी लाईट यासारखे फिचर्स आहेत.

एक्सईव्ही 9 ई आणि बीई 6 ई किंमत, बुकिंग, बॅटरी वॉरंटी

Mahindra XEV 9e ची एक्स शोरूम किंमत 21.90 लाख रुपयांपासून सुरू होईल. तर Mahindra BE 6e ची किंमत १८.९० लाख रुपयांपासून सुरू होईल. अशाप्रकारे या कारच्या पॅक-१ च्या किंमती सांगण्यात आलेल्या आहेत. तर इतर पॅक 2 आणि पॅक 3 अशा तीन व्हेरियंटमध्ये पॅकच्या किंमती आणखी खुलासा करण्यात आलेला नाहीये. यात चार्जर आणि इन्स्टॉलेशनच्या खर्चाचा समावेश केला नाहीये. कंपनी या कारमधील बॅटरीकरिता चार्जरचे दोन पर्याय देणार आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article