Thane | मॉलमध्ये स्पाच्या आड सेक्स रॅकेट, थाई महिलांसह 9 जणींची सुटका

2 hours ago 1
पुढारी वृत्तसेवा

Published on

10 Oct 2024, 4:58 am

Updated on

10 Oct 2024, 4:58 am

ठाणे : ठाणे पोलिसांनी दोन सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करत थायलंडमधील दोन महिलांसह आणखी नऊ महिलांची सुटका केली आहे. या प्रकरणात थायलंडमधील एका महिलेसह एकूण चार जणांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. मॉलमध्ये असलेल्या स्पामधून सेक्स रॅकेट चालवले जात असल्याच्या माहितीवरून गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी या ठिकाणी छापा टाकला होता.

ठाण्याच्या हाई स्ट्रिट मॉल, कापुरबावडी जंक्शन, ठाणे येथे एवलॉन वेलनेस फॅमिली स्पा सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी व सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांना मिळाली होती. मंगळवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास पोलीस पथकाने या स्पा सेंटर येथे बनावट ग्राहक पाठवून सदर ठिकाणी पंच व पोलीस पथकाने छापा कारवाई करून कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी स्पा मॅनेजर राहुल किसन गायकवाड (19) व आणखी एका महिलेला ताब्यात घेवुन 7 तरूणींची सुटका केली. सदर मसाज पार्लरच्या मधुन वेश्याव्यवसायातून मिळविलेली एकूण 7 हजार 850 रुपये, 2 मोबाईल, एटीएम, केडीट कार्ड स्वाईप मशिन, व इतर साहीत्य पोलीस पथकाने जप्त केले. पोलीस पथकाने ताब्यात घेतलेल्या आलेल्या मॅनेजर आणि चालक यांच्यासह फरारी असलेल्या आरोपी मालक सुंधाशु कुमार सिंग आणि एका महिलेवर विरोधात कापुरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोेलीस पथक फरारी आरोपींचा शोध घेत आहेत.दोन पीडित थाई महिलांना रेस्क्यू होममध्ये पाठवण्यात आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article