संजय राऊतांनी पुन्हा एकदा तिसऱ्या उपमुख्यमंत्री पदावरून दावा केला आणि हे तिसरे उपमुख्यमंत्री शिंदेंच्या पक्षातून होणार असल्याचं सांगत उदय सामंत यांच्याकडे त्यांनी बोट केलंय.
महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार असं संजय राऊत वारंवार सांगतायत आणि हा तिसरा उपमुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेतला असेल असं सांगून ते उदय सामंतांकडे बोट दाखवतायत. आता तिसऱ्या उपमुख्यमंत्री पदावर बोलण्याचं कारण म्हणजे एकनाथ शिंदेंची जमालगोठ्याची टीका ठरतंय. महाराष्ट्रात सध्या दोन उपमुख्यमंत्री आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असून एकनाथ शिंदे पहिले उपमुख्यमंत्री आणि अजित पवार दुसरे उपमुख्यमंत्री आहेत. मात्र उदय सामंत तिसरे उपमुख्यमंत्री होतील असा दावा राऊत करतायत. ‘राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार आणि तोही शिंदे गटाचा.’, असे म्हणत तिसऱ्या उपमुख्यमंत्री पदावरून अजित पवार यांनाही पत्रकारांनी प्रश्न केला त्यावर अजितदादांनी राऊतांचा दावा फेटाळला. दरम्यान, रायगडच्या पालकमंत्री पद अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे यांना देत शिंदेंच्या शिवसेनेच्या भरत गोगावले यांचा पत्ता कट झाला. अर्थात वादानंतर या पालकमंत्री पदच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली. मात्र शिंदेंनाही संपवून नवा उदय होणार असा दावा वडेट्टीवार यांनी केला होता. वडेट्टीवार यांच्या या वक्तव्यानंतर तिसऱ्या उपमुख्यमंत्री पदच्या चर्चेला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळाले. वडेट्टीवार यांनी फक्त उदय एवढंच नाव घेतलं मात्र राऊतांनी उदय सामंतांचं पूर्ण नाव घेत त्यांच्याकडे वीस आमदार असल्याचा दावा केला. बघा या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट
Published on: Jan 26, 2025 03:10 PM