“उद्यापासून उद्धव ठाकरे गटाला खिंडार पाडायला रत्नागिरीतून सुरुवात होत आहे. संजय राऊतांनी जे काही आरोप केलेत, त्याला प्रत्युत्तर देण्याची सुरुवात उद्या रत्नागिरीतून प्रत्युत्तर देऊन करणार आहे. उबाठाचे आजी माजी आमदार पदाधिकारी हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.''
ठाकरे गटाच्या एका माजी आमदाराचा उद्या रत्नागिरीमध्ये प्रवेश होईल, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे. दावोस दौऱ्यावरून परत आल्यानंतर उदय सामंत यांनी हा मोठा दावा केलाय. पक्ष प्रवेशाचा पहिला टप्पा उद्यापासून रत्नागिरीमध्ये सुरू होईल असं उदय सामंत यांनी म्हटलं. उद्धव ठाकरेंचे चार आणि काँग्रेसचे पाच आमदार शिवसेनेमध्ये प्रवेश करतील, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे. ‘एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उद्यापासून रत्नागिरीपासून उद्धव ठाकरे गटाला खिंडार पडायला सुरुवात होत आहे आणि त्याचा पहिला ट्रेलर उद्या तुम्ही रत्नागिरीमध्ये बघाल, असे म्हणत चार उबाठाचे आमदार, पाच काँग्रेसचे आमदार, तीन उबाठाचे खासदार, दहा माजी आमदार आणि असंख्य जिल्हा प्रमुख हे एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये सामील होतायत, असा मोठा दावा त्यांनी केला. पुढे ते असेही म्हणाले, उद्या रत्नागिरीमध्ये पहिला पक्ष प्रवेश आहे. रत्नागिरीचे काही माजी आमदार हे उद्धव ठाकरेंना सोडून शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. नंतर मी शिंदेंच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर मार्गे सांगलीमध्ये येणार आहे. सांगलीत साऱ्यात येणार आहे साताऱ्यातून पुण्यात येणार आहे, असे ते म्हणाले. तर जे माझ्या नावाची बदनामी करण्याचा प्रयत्न करतायत त्यांनी हे पदाधिकारी आमच्याकडे म्हणजे शिंदेंच्या पक्षामध्ये येण्यापासून रोखून दाखवावे, असं आव्हानही सामंतांनी नाव न घेता राऊतांनी दिलंय.
Published on: Jan 23, 2025 05:34 PM