प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचा अमरावतीत यश:5 हजार 795 घरांमध्ये सौर ऊर्जेचा लखलखाट, वीज बिलातून मुक्तता
3 hours ago
1
अमरावती जिल्ह्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेंतर्गत जिल्ह्यातील ५,७९५ घरांमध्ये सौर ऊर्जेच्या माध्यमातून प्रकाश पडला आहे. महिन्याला तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांसाठी ही योजना वरदान ठरली असून, त्यांना वीज बिलातून मुक्तता मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने राबवल्या जात असलेल्या या योजनेअंतर्गत ग्राहक स्वत:च्या गरजेसाठी वीज वापरू शकतात आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्नही कमवू शकतात. महावितरणने या योजनेला चालना देण्यासाठी विशेष पावले उचलली असून, घरगुती ग्राहकांना छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पासाठी बँकांकडून विनाव्याज कर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या आकर्षक अनुदानामुळे या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. एक किलोवॅट क्षमतेसाठी ३० हजार, दोन किलोवॅटसाठी ६० हजार आणि तीन किलोवॅट किंवा त्यापेक्षा अधिक क्षमतेसाठी ७८ हजार रुपयांपर्यंत थेट अनुदान दिले जाते. २१ जानेवारीपर्यंत राज्यात एक लाख ७०० घरांवर सौर ऊर्जा प्रकल्प बसवले गेले असून, ३९२ मेगावॅट क्षमतेची निर्मिती झाली आहे. ग्राहकांना एकूण ७८३ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना या योजनेचा लाभ घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी ग्रामपंचायतींना विशेष निधी देण्यात येणार आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी नागरिकांनी https://pmsuryaghar.gov.in या वेबसाइटवर नोंदणी करणे आवश्यक आहे. महावितरणने ग्राहकांना मोफत नेट मीटरची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)