नागरिकत्व चौकशीत मोठा विलंब:अंजनगाव सुर्जीतील 1 हजार 184 संशयित नागरिकांच्या प्रकरणात 15 दिवस मुदतवाढ

3 hours ago 1
अंजनगाव सुर्जी येथील नागरिकत्व प्रकरणाची चौकशी करणाऱ्या विशेष समितीला आणखी १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर हे प्रकरण प्रकाशात आले होते. गेल्या नऊ महिन्यांत अंजनगाव सुर्जी तहसील कार्यालयात १,१८४ नागरिकांनी जन्मतारखेच्या दाखल्यासाठी अर्ज केले होते. यापैकी ५६९ अर्जांवर तहसीलदारांनी कोणतीही योग्य पडताळणी न करता मंजुरी दिली. किरीट सोमय्या यांनी या नागरिकांबद्दल बांग्लादेशी असल्याचा आरोप केला असून, योग्य कागदपत्रांशिवाय दाखले दिल्याचे म्हटले आहे. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी थेट लक्ष घालून जिल्हाधिकाऱ्यांना सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. या चौकशीसाठी एसडीओ, बीडीओ, सीओ, ठाणेदार आणि स्थानिक प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची विशेष समिती नेमण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी डॉ. राजेश्वर हांडे यांच्या म्हणण्यानुसार, पोलिस आणि महसूल विभागामार्फत स्थळ पाहणी सुरू आहे. अर्जदारांनी सादर केलेल्या शाळा सोडल्याच्या दाखल्यांची आणि जन्मतारखेच्या नोंदींची शिक्षण विभागाकडून पडताळणी केली जात आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता आणि सखोल चौकशीसाठी समितीला आणखी वेळ आवश्यक असल्याने १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article