Virat kohli Injury :- भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत दमदार सुरुवात केली आहे. नागपुरात खेळल्या गेलेल्या पहिल्या वनडे सामन्यात टीम इंडियाने (Team India )इंग्लंडचा ४ विकेट्सने पराभव केला होता. या विजयानंतरही स्टार फलंदाज विराट कोहली (Virat kohli) दुखापतीमुळे हा सामना खेळू न शकल्याने सर्वजण थोडे चिंतेत होते. आता मालिकेतील दुसरा सामना रविवार 9 फेब्रुवारी रोजी होणार असून कोहली आता फिट आहे की नाही हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. की तो या सामन्यातूनही बाहेर राहणार ? त्यामुळे यावरील सस्पेन्सही आता संपला आहे. टीम इंडिया आणि विराट कोहलीच्या चाहत्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. कारण विराट दुसऱ्या सामन्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त असून मैदानात उतरण्यासाठी सज्ज आहे.
गुडघ्याच्या दुखापतीमुळे बाहेर होता
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना रविवारी कटक, ओडिशात खेळवला जाणार आहे. या सामन्याबाबत सर्वांच्या नजरा विराट कोहलीच्या फिटनेसकडे लागल्या होत्या. पहिल्या सामन्यातून कोहलीला वगळणे सर्वांनाच धक्कादायक होते कारण 15 वर्षांहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट (International cricket) खेळणाऱ्या या स्टार फलंदाजाने आपला उत्कृष्ट तंदुरुस्ती कायम ठेवली होती आणि काही सामने तो गमावला होता. पण खराब फॉर्म आणि अचानक गुडघ्याच्या दुखापतीमुळे पहिल्या सामन्यात त्याची अनुपस्थिती चाहत्यांना त्रासदायक ठरली.
7 महिन्यांनंतर परत येईल
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी त्याच्या दुखापतीने चिंता वाढवली होती पण आता या चिंता कमी झाल्या आहेत. कारण माजी भारतीय कर्णधार (Indian Cricketer)आता पूर्णपणे तंदुरुस्त आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्याच्या एक दिवस अगोदर शनिवारी, ८ फेब्रुवारी रोजी, संघाचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक यांनी पत्रकार परिषदेत विराटच्या फिटनेसबाबत हा महत्त्वाचा अपडेट दिला. विराट आता पूर्णपणे तंदुरुस्त असून दुसऱ्या सामन्यासाठी उपलब्ध असल्याचे प्रशिक्षकाने सांगितले. म्हणजेच दुसऱ्या वनडेत विराटचे प्लेईंग इलेव्हनमध्ये पुनरागमन आता निश्चित झाले आहे. या सामन्यासह विराट ७ महिन्यांनंतर प्रथमच त्याच्या सर्वात मजबूत फॉरमॅट ODI मध्ये खेळताना दिसणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी तयारी करण्याची त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे.
कोहलीसाठी जागा कोण मोकळी करणार?
कोहलीच्या पुनरागमनानंतर आता त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये कोण स्थान देणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर कोटक यांनी कोणताही खुलासा केला नसून हा निर्णय प्रशिक्षक आणि कर्णधार घेतील असे स्पष्टपणे सांगितले. यशस्वी जैस्वालने शेवटच्या सामन्यात पदार्पण केले आणि सलामीला आली. त्यावेळी असे मानले जात होते की कोहलीच्या दुखापतीमुळे त्याच्यासाठी जागा निश्चित केली गेली होती पण सामना संपल्यानंतर श्रेयस अय्यरने खुलासा केला होता की प्रत्यक्षात तो नागपूर वनडेत खेळणार नाही पण कोहलीच्या दुखापतीमुळे त्याच्यासाठी दार उघडले आहे. या सामन्यात अय्यरने अवघ्या ३० चेंडूत स्फोटक अर्धशतक झळकावले होते. अशा स्थितीत त्याला हटवण्याची शक्यता नाही, त्यामुळे युवा सलामीवीर जयस्वालला जागा रिकामी करावी लागणार आहे.