Vivo y300 : या दिवशी भारतीय बाजारात धुमाकूळ घालणारा विवो वाय 300 स्मार्टफोन, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

6 days ago 2

स्मार्टफोन चाहत्यांसाठी आता विवो कंपनी त्यांचा नवीन स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च करणार आहे. दरम्यान विवो कंपनीने त्याच्या अधिकृत वेबसाईट X वर नवीन फोन भारतीय बाजारात लाँच करण्याची तारीख जाहीर केली असून VIVO Y 300 हा नवीन स्मार्टफोन भारतीय बाजारात 21 नोव्हेंबरला लाँच करणार असल्याची घोषणा केली आहे. याशिवाय कंपनीने या टीझरमध्ये आगामी स्मार्टफोनच्या डिझाइनचाही खुलासा केला आहे. विवो वाय 300 मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला असून कॅमेरा लेन्सच्या अगदी खाली रिंग लाइट देखील देण्यात आली आहे.

विवो वाय 300 मध्ये मेटॅलिक फ्रेमसह बॉक्सी डिझाइन केलेला आहे. हा फोन डार्क पर्पल, सी ग्रीन आणि ग्रे या तीन कलरच्या ऑप्शनमध्ये येणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. कंपनीने अद्याप या व्हेरियंटची मार्केटिंग नावे जाहीर केलेली नाहीये. पण तुम्हाला या फोनमध्ये उत्तम फोटोग्राफीसाठी चांगल्या लो-लाइट ऑरा लाइट्स देखील देण्यात आले आहेत. ज्याने तुम्ही छान फोटोग्राफी करू शकतात.

Vivo Y300 : अपेक्षित किंमत

विवो कंपनीने मागच्या वर्षी लाँच झालेल्या विवो वाय 200 पेक्षा नव्या फोनच्या बॅक पॅनलची डिझाईन खूपच वेगळी आहे. दरम्यान कंपनीने अद्याप नव्या फोनची किंमत जाहीर केली नसली तरी गेल्यावर्षी लाँच करण्यात आलेल्या विवो वाय 200 ची किंमत हि 20,000 रुपयांपेक्षा कमी होती. त्यामुळे विवो वाय 300 हा फोन देखील अंदाजे 25,000 रुपयांपेक्षा कमी असल्याचा आपण अंदाज लावू शकतो. या स्मार्टफोनच्या लाँचची तारीख आणि डिझाईनच्या व्यतिरिक्त कंपनीने अद्याप नव्या फोनबद्दल इतर फीचर्सची माहिती सांगितलेली नाहीये.

Vivo Y 300 चे अपेक्षित फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

विवो वाय 300 या नव्या फोनमध्ये 6.67 इंचाचा AMOLED डिस्प्ले असण्याची शक्यता आहे जी फुल HD + रिझोल्यूशन आणि 1080 x 2400 पिक्सलवर 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट देणारा आहे. कंपनीच्या टीझरनुसार या फोनच्या बॅक पॅनेलवरील ड्युअल कॅमेरा सेटअपमध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर असून 8 मेगापिक्सलचा सेकंडरी लेन्स असण्याची शक्यता आहे. प्रायमरी कॅमेरा Sony IMX882 सेन्सरचा वापर करेल, जो विस्तृत पोर्ट्रेट शॉट्ससाठी उत्तम आहे.

किती मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा

VIVO Y 300 यामध्ये तुम्हाला सेल्फीसाठी 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असू शकतो, ज्यामुळे तो त्याच्या रेंजमधील इतर अनेक मॉडेल्सपेक्षा वेगळा असणार असेल. भारतीय बाजारात लाँच होणार मिड-रेंज स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 4 जेन 2 चिपसेटसह 8 जीबी पर्यंत रॅम असण्याची शक्यता आहे. याशिवाय फोनमध्ये 80 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh ची बॅटरी असण्याची शक्यता आहे.

कनेक्टिव्हिटी फीचर्स

VIVO Y300 मध्ये वाय-फाय 5, ब्लूटूथ 5.0, जीपीएस (GPS) आणि यूएसबी-सी पोर्ट सारखे कनेक्टिव्हिटी पर्याय देण्यात आले आहेत. अँड्रॉइड 14 वर आधारित FunTouch OS 14 वर चालणाऱ्या या डिव्हाइसमध्ये स्टीरिओ स्पीकर्स आहेत आणि धूळ आणि पाण्याच्या रेजिस्टेंससाठी IP64 रेटिंग दिली गेली आहे. बायोमेट्रिक अॅक्सेससाठी यात अंडर डिस्प्ले ऑप्टिकल फिंगरप्रिंट सेन्सर देखील देण्यात आला आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article