Chhagan Bhujbal, Manikrao ShindeFile
Published on
:
31 Jan 2025, 3:59 am
Updated on
:
31 Jan 2025, 3:59 am
नाशिक : विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्याने येवल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार अॅड. माणिकराव शिंदे यांनी ईव्हीएमच्या कार्यपध्दतीवर आक्षेप घेत फेरमतमोजणीच्या केलेल्या मागणीवर निवडणूक आयोगाने दिलेला पर्याय मान्य केल्याने येत्या 24 फेब्रुवारी रोजी येवला विधानसभा मतदारसंघातील एका मतदारकेंद्रावरील ईव्हीएमवर मॉकपोल घेतला जाणार असल्याची माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी शशीकांत मंगरुळे यांनी दिली.
राज्यात विधानसभा निवडणुक 2024 मध्ये महाविकास आघाडीच्या दिग्गज उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागल्याने त्यांनी ईव्हीएमच्या कार्यपध्दतीवर आक्षेप घेतला होता. येवल्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अॅड. माणिकराव शिंदे व बंडूकाका बच्छाव यांनी फेरमतमोजणीसाठी जिल्हा निवडणूक विभागाकडे पैसे भरुन अर्ज दाखल केले होते. याचवेळी कळवण-सुरगाणा मतदारसंघातील माकपाचे उमेदवार जे. पी. गावित यांच्यासह मालेगाव बाह्य मतदार संघातील अपक्ष उमेदवार बंडु काका बच्छाव व मालेगाव मध्यचे शेख आसिफ शेख रशिद व निफाड मतदार संघातुन एका मतदाराने न्यायालयामध्ये निवडणुक निकालाला आव्हान दिले आहे. अॅड. शिंदे यांच्या मागणीनुसार निवडणूक निकालाने दिलेला पर्यार अॅड. शिंदे यांनी मान्य केल्याने 24 फेब्रुवारी रोजी मॉकपोल घेतला जाणार आहे.
सिद्ध पिंप्री येथील गोदामात मॉकपोल
या याचिकांची सुनावणी बाकी असतांना आता अॅड. शिंदे यांच्या येवला मतदार संघातील एका मतदान केंद्रावरील ईव्हीएमचा डाटा डिलीट करुन त्या ईव्हीएमवर पुन्हा मतदानाची पडताळणी केली जाणार आहे. सोमवार (दि.24) फेब्रुवारीरोजी हा मॉक पोल घेतला जाणार आहे. तपासणीसाठी त्या मतदार संघात निवडणूकीसाठी उभ्या असलेल्या सर्व उमेदवारांना बोलवले जाणार आहे. सध्या येवला मतदार संघातील सर्व ईव्हीएम हे नाशिकच्या सय्यद पिंप्री येथील निवडणूक शाखेच्या गोदामात सील करण्यात आले आहे. त्यामुळे तेथेच हा मॉक पोल घेण्यात येणार असून तो सकाळी 8 वाजता सुरु करण्यात येणार 1400 च्या जवळपास असलेले हे मतदान सायंकाळ पर्यन्त सुरु राहणार आहे.