अक्षयच्या एन्काउंटरवर आई-वडिलांना संशय:म्हणाले - आमचा मुलाने कधी फटाके फोडले नाही, तो गोळीबार कसा करेल

2 hours ago 1
बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा 23 सप्टेंबर रोजी पोलिसांनी केलेल्या एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला. या प्रकरणावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. तर आता अक्षयच्या आईनेही या एन्काउंटरवर प्रश्न उपस्थित करत संताप व्यक्त केला आहे. माझ्या मुलाला मारण्यासाठी पोलिसांना कुणीतरी पैसे दिले असतील, असा आरोप अक्षय शिंदेच्या आईने केला आहे. आम्ही अक्षयचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिकाही त्याचा पालकांनी घेतली आहे. माध्यमांशी बोलताना अक्षयचे वडील म्हणाले की, या एन्काउंटरची सखोल चौकशी करावी. कुणाच्या तरी दबावातून हे करण्यात आले आहे. माझ्या मुलाने कधी फटाके फोडले नाहीत. त्याला गाडी चालवता येत नाही. तो पिस्तुल खेचून गोळ्या कशा चालवू शकतो. सोमवारी दुपारीच आम्ही तळोजा कारागृहात अक्षयची भेट घेतली होती. आम्ही अक्षयचा मृतदेह ताब्यात घेणार नाही. अक्षयला मारण्यासाठी कुणीतरी पैसे दिले असतील माध्यमांशी बोलताना अक्षयची आई म्हणाली की, पोलिसांनी माझ्या मुलाला मारले आहे. प्रकरण न्यायालयात सुरू असताना माझ्या का मारले, असा सवालही त्याच्या आईने विचारला आहे. माझ्या मुलाला मारण्यासाठी पोलिसांना कुणीतरी पैसे दिले असतील. त्यामुळेच पोलिसांनी माझ्या मुलाचा एन्काउंटर केला, असा आरोप देखील अक्षयच्या आईने केला आहे. अक्षयच्या खिशात एक पेपर होता पुढे बोलताना अक्षयची आई म्हणाली की, आम्ही सोमवारी अक्षयची तुरूंगात भेट घेतली, तेव्हा मम्मी इथून मला केव्हा घेऊन जाणार, असे त्याने विचारले. वकिलांशी बोलून तुला लवकरात लवकर सोडवू, असे मी त्याला म्हटले. यावेळी अक्षयने आम्हाला एक पेपर दाखवून वाचण्यास सांगितले. पण मला वाचता येत नसल्याने त्या पेपरमध्ये काय लिहिले होते हे समजू शकले नाही. पोलिसांनी मुद्दाम तो पेपर अक्षयच्या खिशात ठेवला असावा. त्यावर पोलिसांनी काहीतरी लिहून घेतले असणार, असा आरोप अक्षयच्या आईने केला आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article