राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार-शिवसेना उबाठा ओबीसीसाेबत नाही:प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले मत

2 hours ago 1
धनगर आरक्षणबाबत न्यायालय जाे निर्णय देईल ताे आमच्या पक्षाला मान्य रहाणार आहे. खासदार शरद पाटील यांनी मनाेज जरांगे यांचे आरक्षण मागणीस पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले आहे. शरद पवार हे जरांगे यांच्यासाेबत असून जरांगे यांची मागणी ओबीसीतून मराठा आरक्षण द्यावे अशी आहे त्यास शरद पवाांचा पाठिंबा आहे. त्यासाठी ते प्रयत्नशील आहे. त्यांचा प्रयत्न विधानसभा निवडणुक नंतर हाेईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार व शिवसेना उबाठा हे ओबीसी साेबत नाही हे स्पष्ट झाले असे मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. आंबेडकर म्हणाले, ओबीसीचे आरक्षण हे ज्या तत्वावर सर्वाच्च न्यायालयात थांबवले. राज्यातील समाजाचा इम्पाेरिकल डाटा नसल्याने ते पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे जातीय जनगणना मागणी करुन शिक्षण व नाेकरीतील त्याशिवाय दिले जाऊ शकत नाही. ओबीसींना आरक्षण वाचवयाचे असेल तर त्यांनी किमान १०० आेबीसी आमदार यंदा विधानसभा निवडणुकीत निवडून आले पाहिजे. राजकीय पक्ष आपले रंग दाखवून देतील कारण शरद पवार यांचे पक्षाने स्वत:चा रंग दाखविण्यास सुरुवात केली आहे. उध्दव ठाकरे यांचे शिवसेनेने देखील ओबीसी साेबत याबाबत आम्ही नाही, तुम्ही केंद्र सरकारकडे जावा असे सांगितले आहे. त्यामुळे दाेन पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार व शिवसेना उबाठा हे ओबीसी साेबत नाही हे स्पष्ट झाले आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये अशी आमची मागणी आहे. आंबेडकर म्हणाले, अक्षय शिंदे हा गुन्हेगार हाेता परंतु त्याला चुकीच्या पध्दतीने शिक्षा करणे याेग्य नाही. आमच्या पक्षाच्या पदाधिकारी रेखा ठाकुर यांनी बदलापूर पोलिस ठाण्यात भेट देऊन पाहणी केली त्यावेळी एफआयआर मध्ये वेगवेगळया दुरुस्त्या झाल्याचे दिसून आले.पहिल्या पासूनच आराेपी व त्याला मदतनीस करणारे कसे माेकळे सुटतील याचा विचार केला गेला. पोलिस सांगतात, आराेपी यास दुसऱ्या केस मध्ये चाैकशील घेऊन जात असताना त्याने रिव्हाॅलवर हिसकावून तीन फायरिंग केले. त्यात एक पोलिस जखमी झाला आहे. संशयाचे वातावरण दूर करण्यासाठी ज्या पोलिस अधिकाऱ्यास गाेळी लागली आहे त्यास आमची पूर्ण सहानभूती आहे. परंतु खरी माहिती समाेर यावी याकरिता शासनाने त्यांचा वैद्यकीय अहवाल जाहीर करावा. आता ज्या गाेष्टी सांगितल्या जातात त्या थांबवल्या जातील. नेमके कशाचे चाैकशीसाठी त्याला घेऊन जात हाेते याबाबत खुलासा करण्यात यावा. याबाबतचे स्पष्टीकरण शासन किंवा पोलिसांकडून आला नाही तर काेणाला तरी वाचविण्यासाठी प्रयत्न केल्याचे दिसून येईल. शासनाने संशयाच्या भाेवऱ्यात न अडकता त्यांनी वस्तुस्थिती लाेकांसमाेर आणली पाहिजे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article