नरहरी झिरवाळांचा मुलगा शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेत; पक्षप्रवेश करणार? जयंत पाटील म्हणाले…

2 hours ago 1

Jayant Patil connected Gokul Zirwal : जयंत पाटील यांनी गोकुळ झिरवाळ यांनी लावलेल्या बॅनरवर प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील यांनी 'शिवस्वराज्य यात्रा'च्या निमित्ताने माध्यमांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. वाचा बातमी सविस्तर.....

नरहरी झिरवाळांचा मुलगा शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेत; पक्षप्रवेश करणार? जयंत पाटील म्हणाले...

जयंत पाटील

| Updated on: Sep 24, 2024 | 1:30 PM

राष्ट्रवादी शरद पवार गटाची ‘शिवस्वराज्य यात्रा’ सध्या सुरु आहे. ही ‘शिवस्वराज्य यात्रा’ आज नाशिकमध्ये आहे. शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेत अजित पवार गटाचे आमदार नरहरी झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ उपस्थित आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या स्वागताचे बॅनर गोकुळ झिरवाळ यांनी लावले आहेत. त्यामुळे गोकुळ झिरवळ राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा होत आहे. यावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जयंत पाटील काय म्हणाले?

गोकुळ झिरवाळ यांनी बॅनर लावले याचा अर्थ असा की, त्यांचं माझ्यावर प्रेम आहे. त्यांच्या पक्षप्रवेशाची काही चर्चा झालेली नाही. तसा संपर्क झालेला नाही. त्यांनी उमेदवारीचा अर्ज केलेला आहे. पण आमच्या पक्षाने अजून उमेदवार ठरवलेला नाही, असं जयंत पाटील म्हणालेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article