Naresh Arora connected Ajit Pawar Pink overgarment Campaigning : अजित पवार यांच्यासाठी राजकीय रणनीतीकार म्हणून काम करणाऱ्या नरेश अरोरा यांनी या निवडणूक काळात यांनी कॅम्पेनिंग केलं. याबाबत नरेश अरोरा यांनी भाष्य केलं आहे. तसंच यंदाच्या निवडणुकीवरही त्यांनी भाष्य केलं आहे.
नरेश अरोरा, अजित पवारImage Credit source: Facebook
लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांच्या पर्सनॅलिटीमध्ये लोकांना बदल दिसला. लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यानंतर अजित पवार हे गुलाबी जॅकेटमध्ये दिसले. अजित पवार यांच्यासाठी ‘गुलाबी कॅम्पेनिंग’ राबवणारे राजकीय रणनीतीकार नरेश अरोरा यांनी निवडणुकीवर भाष्य केलं आहे. अजित पवार यांच्या ‘गुलाबी कॅम्पेनिंग’वर देखील नरेश अरोरा यांनी सविस्तर माहिती दिली आहे. अजित पवारांना चेंज करणारा अवलिया आहेत… दादांना मी काहीही चेंज केलं नाही. मात्र दादांचा रोल चेंज झालाय. आता म्हणून दादांमध्ये बदल झाला आहे. ते पक्षाचे अध्यक्ष झाले आहेत. दादांनी त्यांचा रोल समजून घेतला. अजित दादा आता पक्षाचे अध्यक्ष झाल्यामुळे त्यांचा हा रोल चेंज झाला आहे, असं अरोरा म्हणालेत.
अजित पवार सुद्धा आपलं राजकारण शरद पवार यांच्याकडून शिकले. दादांनी ठरवलं होतं मी कुणवर टीका करणार नाही. दादा स्वतःच्या कामावरती गर्व करतात. दादांनी आपल्या कामावर खूपच केला आणि त्याचाच हा परिणाम दिसून आला, असं अरोरा म्हणालेत.
लोक भावना आहे की अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत. मात्र यासाठी नंबर हे खूप महत्त्वाचे असतात, असं अरोरा म्हणाले.