लोकशाहीPudhari News network
Published on
:
25 Nov 2024, 5:04 am
Updated on
:
25 Nov 2024, 5:04 am
नाशिक : विधानसभा निवडणुकीत निकालानंतर महायुतीचे अत्याधिक उमेदवार निवडून येतील हे अपेक्षितच होते. परंतु भाजपच्या विजयी उमेदवारांची संख्या बघता विरोधीपक्षही निकालानंतर बाद झाल्याचे दिसून आले हे सशकत लोकशाहीसाठी धोक्याचे ठरु शकते , अशा प्रतिक्रिया नाशिककरांनी व्यक्त केल्या.
महायुती येणार हे अपेक्षीतच पण.. यंदा निवडणुकात अटीतटीचा निकाल अपेक्षीत होता. मात्र जनतेने एकतर्फी मते दिल्याने निकाल एकतर्फीच लागला. विरोधीपक्ष तुल्यबळ असतो, तेव्हाच सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवला जातो. मात्र यंदा मतदारांचा असा एकतर्फी कौल दिसून आला. सशक्त लोकशाहीसाठी अशी परिस्थिती धोक्याची ठरु शकते.
प्रविण काळोखे, नाशिक.
नाशिकमध्ये काही मतदारसंघात प्रस्थापित आमदार विरोधी जनमत असल्याचे जाणवले. मात्र त्यानंतर अनेकांनी तिकीट न मिळाल्याने पक्षांतर करुन निवडणुक लढवली हे लाेकांना आवडले नाही. त्यामुळे अशा उमेदवारांना मतदारांनी नाकारत पुन्हा पहिल्याच आमदारांना जनतेने संधी दिली.
किशोर जाधव, नाशिक
राज्यातील राजकारण गेल्या ६ दशकात झाले नसेल इतके तळाला गेले होते, तरुणांना विकास आणि राेजगार हवा आहे. स्थिर सरकार यावे यासाठी महायुतीला सर्वाधिक मते पडली. महिलांच्या योजनांनी पुरुषांनाही भाजपला मत देण्यास प्रवृत्त केले. महिला अन तरुणाई 'गेमचेंजर' ठरली.
प्रा. सचिन काकडे-पाटील, विद्युत अभियंता, नाशिक.
ही तर भाजपची महालाट महायुतीचे राज्यात सरकार येणे अपेक्षीत होते परंतु यावेळी भाजपची लाट दिसून आली. जनतेने शेतकरी, महिलांच्या योजनांकडे पाहून एकगठ्ठा मते विद्यमान आमदारांना दिली. भ्रष्ट्राचार, बेरोजगारी, अमलीपदार्थ आदी मुद्दे निवडणुकीच्या प्रचारात होते. आता विकास आणि रोजगार वाढले असे वाटते.
आदिती, नाशिक.