आता यापुढील निवडणुका फक्त अर्थकारणावरच होणार असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. असे म्हणत जय ईव्हीएम असेही आव्हाड म्हणाले.
एक्सवर पोस्ट करून आव्हाड म्हणाले की, विचारधारा वगैरे आता विसरायला हवं. यापुढील निवडणुका फक्त अर्थकारणावरच होणार आहेत; किंबहुना त्या आर्थिक ताकदीवरच लढल्या जातील, अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्याचा आर्थिक पुरवठा मजबूत तोच निवडणुकीत टिकेल. आता शिव, फुले, शाहू,आंबेडकरांचा महाराष्ट्र फक्त बोलण्यापुरताच उरलाय असे आव्हाड म्हणाले.
विचारधारा वगैरे आता विसरायला हवं. यापुढील निवडणुका फक्त अर्थकारणावरच होणार आहेत; किंबहुना त्या आर्थिक ताकदीवरच लढल्या जातील, अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्याचा आर्थिक पुरवठा मजबूत तोच निवडणुकीत टिकेल. आता शिव, फुले, शाहू,आंबेडकरांचा महाराष्ट्र फक्त बोलण्यापुरताच उरलाय.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 24, 2024
निकालाच्या दिवशी सकाळी 9 वाजता महाविकास आघाडी 137 जागांवर पुढे होती. पण साडे अकरा वाजता मविआ केवळ 53 जागांवर पुढे होती. टीव्हीवरील या कलाचा एक फोटो पोस्ट करून आव्हाड यांनी जय ईव्हीएम असे म्हटले आहे.
#EVM ki jai ho https://t.co/NS6XQeaPZ5 pic.twitter.com/UjVOJxNnyd
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 25, 2024