शब्द पाळण्यासंदर्भात भारतीय जनता पक्षाचा इतिहास चांगला नाही. पण आता कदाचित महाराष्ट्राशीच वैर घ्यायचं असल्यामुळे ते कोणतीही भूमिका घेऊन शकतात. महाविकास आघाडीच्या पराभवाचं खापर नाना पटोले यांच्यावर फोडलं जात आहे. एका व्यक्तीवर पराभवाचं खापर फोडता येत नाही. आम्ही महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढलो. शरद पवार यांच्यासारख्या नेत्यामागे संपूर्ण महाराष्ट्र उभा असल्याचं चित्र दिसलं, त्यांनाही अपयश आलं.
या अपयशाची कारणं शोधली पाहिजेत. ती कारणं ईव्हीएम मशीनमध्ये आहेत , यंत्रणेच्या गैरवापरात आहेत, घटनाबाह्य कृत्यामध्ये आहेत, की डीवाय चंद्रचूड यांनी न घेतलेल्या निर्णयामध्ये आहेत ? यातलं मुख्य कारण कोणतं ते शोधावं लागेल.या पराभवाला नाना पटोले, शरद पवार की ठाकरे गटाचे नेतृत्तव जबाबदार आहे का, यातून आता बाहेर पडलं पाहिजे. आम्ही तिघांनी एकत्र निवडमणुका लढल्या, काही जागांवर आमच्या भूमिका वेगळ्या असतील , हे महाविकास आघाडीचं अपयशआहे, व्यक्तीगत कोणत्याही पक्षाचं नाही. अशा शब्दांत संजय राऊत यांनी नाना पटोलेंना पराभवास जबाबदार ठरवण्याच्या मुद्यावर स्पष्ट उत्तर दिलं.
ही बातमी अपडेट होत आहे.