राहुरी फॅक्टरी येथील सूर्यानगर येथील रहिवासी मनोज संतुराम हासे यांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी १२ वाजे दरम्यान राहुरी फॅक्टरी येथील वाणी मळा शिवारात नगर-मनमाड मार्गावर घडली. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा असा परिवार आहे# पत्रकार मनोज हासे (वय ४२) हे त्यांच्या दुचाकीवरून नगर-मनमाड मार्गावरून जात होते. वाणीमळा पुलावर अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन ते जागीच मृत्युमुखी पडले. यावेळी पारनेर येथील विधानसभा निवडणुकीची ड्युटी उरकून गणेगाव येथे घरी जात असलेल्या होमगार्ड चांगदेव कोबरणे, होमगार्ड सतीश कोबरणे यांना हासे हे मृत अवस्थेत दिसून आले. त्यांनी घटनास्थळी रुग्णवाहिका चालक रवी देवगिरे यांना बोलावून मृतदेह शवविच्छेदनासाठी राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. घटनास्थळी राहुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे, पोलिस हेडकॉन्स्टेबल प्रमोद ढाकणे यांनी भेट दिली. दरम्यान, अशोक शिंदे, बाबासाहेब शेळके, प्रवीण बागूल, हॉटेल साई समाधानचे दत्तात्रय दरंदले, राजमुद्रा उद्योग समूहाचे प्रशांत मुसमाडे, पत्रकार श्रीकांत जाधव यांनी मदतकार्य केले. दरम्यान, राहुरी फॅक्टरी येथील अमरधाम मध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)