अमरावती‎ जिल्हाभरातील 56 प्रकल्पांमध्ये‎ आजघडीला 88.45 टक्के पाणी:आगामी काळात पिण्याला तसेच शेतीला मिळेल पूरक पाणी‎

2 hours ago 1
जिल्ह्यात झालेल्या संततधार तसेच प्रकल्प क्षेत्रात झालेल्या पावसाने मोठा प्रकल्प, मध्यम आणि लघु अशा ५६ प्रकल्पात जलसाठ्यात वाढ झाली असून, यातील काही प्रकल्प ओव्हरफ्लो होऊन वाहत असल्याने प्रशासनाने त्या प्रकल्पाचे दारे खुली केली आहेत. यामध्ये एक मोठा अप्पर वर्धा प्रकल्प तर सहा मध्यम प्रकल्पांचा समावेश आहे. आजघडीला ८८. ४५ टक्के जलसाठा आहे. जिल्ह्यात यंदा होत असलेल्या संततधार पावसामुळे प्रकल्पातील पाणीसाठा कमालीचा वाढत आहे. त्यामुळे आगामी काळात पिण्याला तसेच शेतीला पूरक पाणी मिळेल. जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू होती. काही भागात तीन दिवसापूर्वी पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे जलपातळीत आणखी वाढ आहे. त्यामुळे नदी नाल्यांसह मोठे प्रकल्प आणि मध्यम प्रकल्पांच्या जल पातळी वाढली आहे. सद्यास्थितीत ५६ प्रकल्पात उपयुक्त जलसाठा ८८. ४५ टक्के आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या अप्पर वर्धा धरणाचा पाणीसाठा हा ९९. १८ टक्क्यांवर पोहोचला आहे. ७ मध्यम प्रकल्पात ६९.१३ टक्के पाणीसाठा तर ४८ लघु प्रकल्पात ८३.५८ टक्यांवर जलसाठा आहे. यातील अनेक मध्यम आणि लघु प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. सद्यस्थितीत सात प्रकल्पांचे दारे खुली करण्यात आली आहेत. यामध्ये सर्वात मोठा अप्पर वर्धा धरण ९५ टक्यांवर भरले आहेत. याचे ५ गेट १० सेंटी मीटरने खुले करण्यात आली आहेत. यामधून ८२ क्युमेक विसर्ग होत आहे. तर मध्यम प्रकल्प असलेल्या शहानूरचे २ गेट पाच सेंटीमीटरने खुले करण्यात आले आहेत. त्यातून २.११ क्युमेक विसर्ग होत आहे. तसेच चंद्रभागा प्रकल्पाचे ३ गेट पाच सेंमी सोडले असून यातून १७.९० क्यूमेक विसर्ग होत आहे, तर पूर्णाचे २ गेट १० सेंमी खुले केली असून १७.३८ क्युमेक विसर्ग होत आहे. सपनचे २ दारे ५ सेंटी मीटरने उघडी केली असून ८.५६ क्यूमेकने विसर्ग होत आहे. तर पंढरी प्रकल्पातून १.६४२४ क्युमेकने विसर्ग होत आहे. तर गर्गा मधून ११.४६ क्यू मेकने विसर्ग होत आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article