‘त्या’ वादानंतर लक्ष्मण हाके यांची पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाले…

3 hours ago 1

ओबीसी समाजाचे आंदोलक लक्ष्मण हाके यांनी मद्यप्राशन करुन वाद घातल्याचा आरोप काही तरुणांनी केला. सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करुन लक्ष्मण हाके यांनी वाद घातल्याचा दावा मराठा तरूणांनी काल केला होता. आता या मुद्यावर लक्ष्मण हाके यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी त्यांची बाजू स्पष्ट केली. ओबीसी आंदोलनाला बदनाम करण्याचा हा डाव आहे, असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला.

मी वॉकिंगला गेलो असता 5 वाजता मला तो मुलगा भेटला होता. त्या मते नावाच्या मुलाचा सीडीआर किंवा मोबाईल तपासला तर त्याने कुणाकुणाला कॉल केले याचे डिटेल्स जरी घेतले तरी त्यांचा कसा पूर्वनियोजित कट होता, ते समजेल. ओबीसी आंदोलनाला बदनाम करण्याचा हा डाव आहे, असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला.

खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावर केली टीका

पण याही पलीकडे जाऊन कोल्हापूरचा एक नेता ,स्वत:च्या अस्तित्वासाठी धडपडणारा, त्यांना मी फक्त कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराजांच्या सामाजिक न्यायाच्या धोरणाची आठवण करून दिली. छत्रपती शिवरायांच्या रयतेच्या राज्याची आठवण करून दिली आणि महाराष्ट्रात असलेल्या 50 ते 60 टक्के ओबीसी हा आम्ही छत्रपती शिवरायांना मानणारे आहोत, त्या गादीला मानणारे आहोत. कोल्हापूरचा तो नेता रयतेचा राजा असता तर तो ओबीसींच्या आंदोलनालाही भेट द्यायला आला असता, ही माफक अपेक्षा ओबीसींचा नेता म्हणून महाराष्ट्रासमोर मांडली. आम्ही तुम्हाला राजा का म्हणावं ? हा प्रश्न फक्त कोल्हापूरच्या संभाजी भोसले यांना मी विचारला. मला वाटलं ते हे खिलाडू वृत्तीनं घेतील, काही आत्मपरीक्षण करेल, छत्रपतीं शिवरायांच्या रयतेचा कसा कारभार होता, ते पाहील. किंवा सामाजिक न्याया देणाऱ्या छत्रपती शाहूराजांचे विचार पाहील. पण त्या माणसाने माझ्या अंगावरीत मारेकरी घातले, असा गंभीर आरोप लक्ष्मण हाके यांनी केला.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article