अमरावतीत सलग 401 तास गायन:वादन, नृत्य; विश्वविक्रमाकडे झेप

2 hours ago 1
शेगाव नाका स्थित अभियंता भवन येथे १८ दिवसांपासून सुरु असलेल्या गायन, वादन, नृत्य कार्यक्रमाचा मंगळवारी दुपारी समारोप झाला. या १८ दिवसांत अमरावतीच्या कलावंतांनी ४०१ तास गायन, वादन व नृत्ये केली. चोवीस तासांच्या दिवसात केवळ २० मिनीटांचा खंड असा हा कार्यक्रम होता. ‘हुनर की तलाश’ या नावाने विश्वविक्रमासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाच्या नोंदीसाठी वर्ल्ड रेकॉर्डचे सीइओ पंकज सोलंकी याठिकाणी उपस्थित होते. ४ जानेवारीपासून सुरू झालेल्या या कार्यक्रमात शहरातील विविध क्षेत्रात कार्यरत नागरिकांनी सलग ४०१ तास आपली कला सादर केली. अमरावतीत पहिल्यांदाच एवढा लांबलचक कार्यक्रम झाला. ४०१ तास पूर्ण होताच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली व सर्व आयोजक मंडळींनी एकच जल्लोष केला. यामुळे संपूर्ण अभियंता भवन परिसर दणाणून गेले होते. या कार्यक्रमाला आमदार सुलभाताई खोडके, नागपूरचे मनीष पाटील, शिवसेनेचे नानक नेभनानी, समाजसेवक गोविंद कासट, बिल्डर सचिन वानखडे, अभिनंदन बँकेचे सुदर्शन जैन, पुरुषोत्तम मुंदडा, महात्मा फुले बँकेचे संचालक राजेंद्र आण्डे, चंद्रकांत पोपट उपस्थित होते. स्वराध्या एंटरटेनमेंटने यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये अनेक कलावंतांनी संगीताच्या माध्यमातून आपली कला येथे सादर करून व विविध गायन करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. प्रास्ताविक स्वराध्या एंटरटेनमेंटच्या संचालिका स्वामिनी तायडे व दिनकर तायडे यांनी केले. संचालन ईशांत राजगुरे यांनी केले. आभार दीप्ती सहारे यांनी मानले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article