रेल्वेखाली चिरडून १३ जणांचा मृत्यू, १० जणांची ओळख पटलीfile photo
Published on
:
23 Jan 2025, 4:24 am
Updated on
:
23 Jan 2025, 4:24 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : जळगावनजीकच्या परधाडे रेल्वेस्थानकानजीक घडलेली घटना दुर्दैवी आहे. या दुर्घटनेत १३ प्रवासी जागीच ठार झालेत. १० जणांची ओळख पटली असून तिघांची ओळख पटत नाही, शरीराचे तुकडे झाले आहेत. निव्वळ अफवांमुळे ही घटना घडली आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
गुरूवारी माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, रेल्वेच्या रसोई भागाला आग लागल्याचं ऐकून बोगीत बसलेल्या प्रवाशांनी उड्या मारल्या. आग लागली आग लागली अशी आरडाओरड सुरू झाली. त्यामुळे बोगीत गोंधळ उडाला. जीव वाचवण्यासाठी प्रवाशी उड्या मारत असताना काहींनी साखळी ओढली. अफवांमुळे ही घटना घडली आहे. आता तिथली परिस्थिती पूर्वपदावर आलेली आहे. रेल्वे त्या-त्या ठिकाणी रवाना झाल्या आहेत. या घटनेत तेरा लोकांचा मृत्यू झाला आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.