बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांच्याकडून देखील एक जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र या जाहीरातीची सध्या चांगलीच होतेय चर्चा
23 जानेवारी रोजी बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस विजयोत्सव म्हणून साजरा करण्यात येत आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि शिवसैनिकांनी कुलाबा येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केले. यासह ठाकरे गटातील अनिल देसाई, संजय राऊत आणि अरविंद सावंत यांच्याकडून आज बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देण्याची मागणी देखील केल्याचे पाहायला मिळाले. तर दुसरीकडे अनेक राजकीय नेत्यांकडून बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त वृत्तपत्रातून जाहीराती देखील देण्यात आल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांच्याकडून देखील एक जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र या जाहीरातीची सध्या चांगलीच चर्चा होताना दिसतेय. कारण तानाजी सावंत यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमधून शिवसेनेचं धनुष्यबाणच चिन्हच गायब असल्याचे पाहायला मिळाले. इतकंच नाहीतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचा फोटो देखील लहान दाखवण्यात आल्याने त्याचीही चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. बघा व्हिडीओ
Published on: Jan 23, 2025 03:18 PM