आपण अनेकवेळा पाहिलं असेल की आपल्या शर्टचा खिसा हा डाव्या बाजूने असतो. आता आलेल्या नवीन फॅशननुसार दोन्ही बाजूने खिशांची पद्धत आलीये. ही फॅशन हल्लीच आली असली आधीपासून सगळ्या शर्टचा खिसा हा शक्यतो शर्टच्या डाव्या बाजूलाच असतो. पण आपल्यापैकी कोणीही असा विचार केला नसेल की नक्की हा खिसा शर्टच्या डाव्या बाजूलाच का असतो?
खिसा शर्टच्या डाव्या बाजूलाच का असतो?
पॅन्ट असोत किंवा शर्टला खिसा हा असतोच. शर्टच्या खिसाचा उपयोग हा पेन, पैसे, तिकिटं ठेवण्यासाठी उपयोग होतो. पण तुम्ही नीट पाहिलं असेल तर आपल्या लक्षात येईल की शर्टचा खिसा हा फक्त डाव्या बाजूला असतो. पण असं का? त्यामागे अशी अनेक कारणं सांगितली जातात. त्यापैकी एक म्हणजे
माणसाची उजव्या हाताने काम करण्याची सवय. क्रिस क्रॉस प्रक्रिया ही नेहमीच कोणतंही काम करण्यासाठी जास्त चांगली असते. जसे आपण उजव्या हाताने डावीकडील काम करु शकतो, तर डाव्या हाताने उजवीकडील काम करणं जास्त सोपं होतं.
शर्ट आपल्या रोजच्या आयुष्यातील एक भाग
एका रिपोर्टनुसार पुरुषांच्या शर्ट, ट्राउझर्स, जीन्स, लोअर्स, शॉर्ट्स आणि अगदी टी-शर्टमध्ये खिसे बनवले जात होते, परंतु महिलांच्या शर्टमध्ये पूर्वी खिसे नव्हते. हा ट्रेंड खूप नंतर आला आहे, त्यांच्या इतर कपड्यांनाही खिसा नसायचा. पण आता बऱ्याच पॅटरनच्या शर्टमध्ये खिसा हा असतोच. पण तो डाव्याचं बाजूला का असतो याचं उत्तर 99% लोकांना माहितच नाही. म्हणजे शर्ट आपल्या रोजच्या आयुष्यातील एक भाग आहे. आणि यामागचं कारण अतिशय इंटरेस्टिंग आहे.
डाव्याबाजूला असलेल्या खिशामुळे वस्तू हाताळणे सोपे.
बहुतेक शर्टचे खिसे डाव्या बाजूला असतात. यामागे कोणतेही वैज्ञानिक कारण नाही. तर, लोकांच्या सोयीचा विचार करून खिसा डाव्या बाजूला ठेवण्यात आला आहे. बहुतेक लोकांना डाव्या खिशात वस्तू काढणे किंवा ठेवणे सोपे वाटते. कारण जगभरातील बहुतांश लोक हे उजव्या हाताने काम करतात.
जे लोक उजव्या हाताचा जास्त वापर करतात त्यांच्यासाठी डाव्या बाजूला खिसा असणे अधिक सोयीचे असते. कारण जगभरातील बहुतांश लोक हे उजव्या हाताने काम करतात.
महिलांच्या शर्टवरही आता खिसे असण्याची फॅशन
जे लोक उजव्या हाताचा जास्त वापर करतात त्यांच्यासाठी डाव्या बाजूला खिसा असणे अधिक सोयीचे असते. आता फॅशनमध्ये खूप बदल झाले आहेत. पूर्वी फक्त पुरुषांच्या शर्टमध्येच खिसे असायचे आणि तेही फक्त डाव्या बाजूला. महिलांच्या शर्टवर खिसे नव्हते. काळ बदलला तसतसे महिलांच्या सोयींचा विचार केला जाऊ लागला. महिलांच्या शर्टमध्येही डाव्या बाजूला खिसे असू लागले. यामागील कारण म्हणजे बहुतेक लोक उजव्या हाताने काम करतात.
शर्टच्या दोन्ही बाजूंना खिशांची फॅशन
मात्र आता शर्टला एक खिसाऐवजी आता दोन खिसेही दिसतात. आता हा एक ट्रेंडच बनला आहे. फॅशन बदलू लागल्याने, काही शर्टमध्ये उजव्या बाजूला किंवा दोन्ही बाजूला खिसे असतात.
फॅशनच्या दृष्टिकोनातून, डाव्या बाजूला खिसा असल्याने शर्ट अधिक आकर्षक दिसला. अशाप्रकारे, शर्टच्या डाव्या बाजूला खिसा ठेवण्याची प्रथा सुरू झाली. जी आता फॅशनचाही एक भाग बनली आहे. पण आता हे वाचून शर्टच्या डाव्याच बाजूला खिसा का असतो हे मात्र नक्कीच तुम्हाला समजलं असेलच