आयपीएस पुलकित सिंह यांनी गोदावरी नदीपात्रातून वाळू तस्करांची शोधमोहीम घेतली
Published on
:
23 Jan 2025, 3:04 pm
Updated on
:
23 Jan 2025, 3:04 pm
शहागड प्रतिनिधी : अंबड तालुक्यातील आयपीएस पुलकित सिंह यांनी गुरूवारी (दि.२३) वाळकेश्र्वर ते आपेगाव गोदावरीनदीपात्रात बोटने २२ किमीचा प्रवास करत अवैध वाळू तस्करांची शोध मोहीम घेतली. यावेळी अवैध वाळू वाहतुकीसाठी खोदले जीसीबीनेत्यांनी खड्डे जागोजागी दिसून आले. याबाबत वाळू माफियांना कुणकुण लागल्याने ते गोदावरी नदीपात्रातून बस्तान घेऊन पसार झाले.
आयपीएस अधिकारी पुलकित सिंह, नायब तहसीलदार विवेक उढाण यांनी आज (गुरूवारी) शहागड येथील कोल्हापूरी बंधारा, शहागडचा नविन व जुना पुल, गोदावरी नदीपात्रात जाऊन अवैध वाळू उत्खनन कुठे होतं आहे का? याची शोध मोहीम घेतली. तसेच गोरी-गांधारी येथील गोदावरी नदीच्या पात्रात पाण्यातील होडीतून डोमलगाव, साष्टपिंपळगाव, आपेगाव असा प्रवास करत अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.अवैध वाळू उत्खनन व वाहतूक ही रात्रीची चालत असल्याने महसूलच्या पथकाच्या हाती काही लागले नाही. दरम्यान पाण्यातून अवैध वाळू उत्खनन करण्यासाठीचे ४ कोणी यंत्र दोरखंड पोलिसांनी जप्त केले.