येथे मार्कंडा मंदिराच्या पाहणीवेळी मुख्य सचिव सुजाता सैनिक यांनी मोबाईलमध्ये फोटो घेतले. Pudhari Photo
Published on
:
23 Jan 2025, 3:10 pm
Updated on
:
23 Jan 2025, 3:10 pm
गडचिरोली : राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी आज मार्कंडा मंदिराला भेट देऊन पाहणी केली. श्रीमती सौनिक यांनी मार्कंडा मंदिर परिसरात होणाऱ्या विकासकामांचा आढावा घेऊन पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
यावेळी जिल्हाधिकारी अविशांत पांडा, नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक निलोत्पल, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता नीता ठाकरे, सहायक जिल्हाधिकारी अमित रंजन प्रामुख्याने उपस्थित होते.
मुख्य सचिवांनी मंदिर परिसरातील घाट, वाहनतळ, बगिचा यांसारख्या कामांची प्रगती तपासून ती चार महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. मंदिराच्या जुन्या ऐतिहासिक साक्षीदार प्रवेशद्वाराची उभारणी, शिर्डीच्या धर्तीवर प्रसादालय, बैठक व्यवस्था, पुस्तकालय, प्राचीन माहिती केंद्र यांची उभारणी आणि शेगाव मंदिराप्रमाणे स्वच्छतेचे नियोजन करण्याच्या सूचना श्रीमती सौनिक यांनी केल्या. मंदिर परिसरात भाविकांसाठी सुयोग्य रस्ता आणि वाहनतळ उभारणे, भक्तनिवास दुरुस्ती व त्यासाठी ऑनलाइन बुकिंगची पारदर्शक व्यवस्था निर्माण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.