Published on
:
23 Jan 2025, 2:47 pm
Updated on
:
23 Jan 2025, 2:47 pm
भंडारा: तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इसमाचाचा मृतदेह चुलबंद नदीपात्रात २३ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास मिळून आला. देविदास दादाजी गुरुनुले (३५) रा. बाळापुर / तळोधी तालुका नागभीड जिल्हा चंद्रपूर असे मृतकाचे नाव आहे .
लाखांदूर येथील नॅचरल ग्रोवर्स साखर कारखान्यामध्ये देविदास कामावर होता. १९ जानेवारी रोजी देविदास हा कारखान्यामधून रात्रीच्या वेळेस निघून गेल्याची माहिती आहे. परंतु तो परत आला नाही. कामगारांनी देविदासचा शोध सुरू केला. त्याचा शोध लागत नसल्याने लाखांदूर पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली. २३ जानेवारी रोजी चुलबंद नदी पात्रात त्याचा मृतदेह आढळला.यावेळी पोलिस निरीक्षक सचिन पवार, उपनिरीक्षक परमेश्वर आगाशे, पोलिस हवालदार गोपाल कोसरे, दिनेश बोरकर, पोलिस नाईक सुभाष सहारे, भूपेश बावनकुळे, दीपक घुले व सुधाकर ढोरे घटनास्थळी उपस्थित होते.